राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील 23 खेळाडू आणि प्रशिक्षकांचा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्र
.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व 23 खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन. विविध क्रीडा प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या सर्वांनी देशाचा गौरव वाढवला आहे. महाराष्ट्रातील 2 खेळाडू, 1 प्रशिक्षक आणि 1 क्रीडा संस्थेला मिळालेला हा सन्मान राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील मानकरी कोण?
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातील चार मानकऱ्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
अर्जुन पुरस्कार- दिव्या देशमुख, बुद्धिबळ : बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विदित गुजराती – बुद्धिबळ- भारताच्या आघाडीच्या बुद्धिबळपटूंमध्ये गणना होणाऱ्या विदित गुजराती यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
द्रोणाचार्य पुरस्कार- नेहा चव्हाण, नेमबाजी : नेमबाजी क्षेत्रातील योगदान आणि खेळाडूंना दिलेल्या प्रशिक्षणासाठी नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार
आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे : पॅरालिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचा गौरव झाल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पातळीवरील या सन्मानामुळे राज्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने ठळक होत आहे. बुद्धिबळ आणि नेमबाजीसारख्या खेळांपासून पॅरालिम्पिक क्रीडेपर्यंत राज्यातील खेळाडू आणि संस्थांचे योगदान वाढत आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारातील या गौरवामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कारविजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर त्यांनी यापुढेही मोठे यश मिळवावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. या पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील नव्या पिढीतील खेळाडूंनाही उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातमी वाचा…
12 वर्षांत प्रथमच कुणालाही खेलरत्न नाही:दिव्या देशमुख-गायत्री गोपीचंदसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार; अरुमायनायगमला जीवनगौरव

क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ ची घोषणा केली. १२ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा कोणत्याही खेळाडूला खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही. यापूर्वी २०१४ मध्ये असे घडले होते. यावर्षी १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, विदित गुजराती, ॲथलीट तेजस्विन शंकर आणि बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद व तृषा जॉली यांसारख्या नावांचा समावेश आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी