Headlines

अवैध सावकारी प्रकरणी शर्मा कुटुंबाच्या मालमत्तांवर धाड:सहकार विभागाची कारवाई; 2 ठिकाणी आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली




बडनेरा परिसरात अवैध सावकारीच्या तक्रारींवरून सहकार विभागाने गुरुवारी शर्मा कुटुंबीयांच्या घर आणि फार्म हाऊससह चार ठिकाणी धाडी टाकल्या. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यापैकी दोन ठिकाणी इसार चिठ्ठी, खरेदी खत, सात-बाराचे उतारे आणि कोरे स्टॅम्प आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळले नाहीत, असे सहकार विभागाने सांगितले. विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. सहकार विभागाला बडनेरा परिसरात बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, चार पथके तयार करून ती वेगवेगळ्या चार ठिकाणी पाठवण्यात आली. ज्यांच्याविरुद्ध तक्रार होती, त्यांच्या बडनेरा (सुभाष चौक) येथील दोन घरांवर, नव्या वस्तीतील निवासस्थानावर आणि बडनेरा रोडवरील फार्महाऊसवर एकाचवेळी ही पथके पोहोचली. झडतीदरम्यान दोन ठिकाणी काही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाही, असे संबंधित पथकांतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पथकांमध्ये तिवसा येथील सहायक निबंधक प्रिती धामणे, नांदगाव खंडेश्वरचे सहायक निबंधक सचिन पतंगे, सहकार अधिकारी (श्रेणी-१) अविनाश महल्ले, तसेच महेश चक्रे, शिल्पा सातपुते, हरीभाऊ भुमरे हे अधिकारी, पंच उमेश काळे व कृणाल भुसारी, आणि लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी निहाल राऊत व दीपाली भोंडे यांचा समावेश होता. या प्रकरणाची पुढील चौकशी आणि तपास सुरू करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदींनुसार केली जाणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *