![]()
अमरावती येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल पाटील आणि बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. मोनिका पाटील यांच्या कन्या दिया आणि माही पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दोघींचा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या परीक्षेत दिया पाटील हिने राज्यात १२ वा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचवेळी, तिची बहीण माही पाटील हिने जिल्ह्यात ११ वा क्रमांक मिळवून आपले कसब दाखवले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. दिया आणि माही या दोघीही स्थानिक शाश्वत शाळेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आहेत. एकाच घरातील दोन सख्ख्या बहिणींनी मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. या देदिप्यमान यशाची दखल घेत, नुकत्याच पार पडलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिया पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षणमंत्र्यांनी दियाला सन्मानपत्र व गौरवचिन्ह प्रदान करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल शाश्वत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. पाटील दांपत्याच्या मुलींनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.
Source link
पाटील भगिनी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकल्या, एकाचा राज्यात 12 वा क्रमांक:दिया राज्यात 12 वी, माही जिल्ह्यात 11 वी; शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार