Headlines

गौरव:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय 'एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान




विद्युत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) या संस्थेचा मानाचा ‘एमिनेंट इंजिनियर’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावती येथे शुक्रवारी (दि. 21) आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. अमरावती येथे 41 वे राष्ट्रीय अधिवेशन ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (आयईआय) च्या 41 व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाचे उद्घाटन अमरावती येथे शुक्रवारी (दि. 21) झाले. या अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर सखोल विचारमंथन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे, ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’चे अध्यक्ष मनिष कोठारी, पदाधिकारी आनंद जवंजाळ, राम विघे, आर. आर. तंवर आणि सुनील राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “अभियंता हे देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार” – चंद्रशेखर बावनकुळे पुरस्कार प्रदान करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभियंत्यांच्या कौशल्याचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले: “अभियंता हे देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार आणि मानवी प्रगतीचे शिलेदार आहेत. भारताच्या अभियंत्यांनी आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर जगात अव्वल स्थान निर्माण केले आहे. एलिफंटा बेटासारख्या दुर्गम ठिकाणी समुद्रातून भूमिगत वाहिनीद्वारे वीज पोहोचवण्याचे अशक्यप्राय आव्हान महावितरण व महापारेषणच्या अभियंत्यांनी लिलया पेलले. हा प्रकल्प भारतीय अभियांत्रिकीच्या कौशल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.” 37 वर्षांच्या सेवेचा गौरव या कार्यक्रमातील एका सत्रात संचालक राजेंद्र पवार यांनी ‘विकसित भारत 2047 चे ऊर्जा उद्दिष्ट: आधुनिक ऊर्जा सुलभतेचा आराखडा आणि महाराष्ट्राची आघाडी’ या विषयावर सादरीकरण केले. देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया’ची स्थापना 1920 मध्ये झाली असून तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. देशभरात 125 पेक्षा अधिक स्थानिक केंद्रे असलेल्या या संस्थेने, राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील 37 वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *