Headlines

औसा संस्थांच्या लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांचे निधन:भाविकांवर दुःखाचा डोंगर, रविवारी दुपारी 2 वाजता औसा येथे होणार अंत्यसंस्कार




श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान (श्री क्षेत्र औसा) चे चौथे पीठाधिपती सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या धर्मपत्नी आणि विद्यमान पीठाधिपती सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर (आईसाहेब) यांचे दुःखद निधन झाले आहे. शनिवारी (दि. 22 ऑगस्ट 2026) रात्री 7.50 वाजता हैदराबाद येथील त्यांच्या ‘आशीर्वाद’ निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीमती लिलाबाई आईसाहेबांच्या जाण्याने औसेकर महाराज परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संस्थानचे लाखो शिष्य आणि भाविक शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर रविवारी, दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता औसा येथील पाराबाई येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात श्री गोरखनाथ महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर आणि श्री बसवंतराव देशमुख (चिडगोपा) हे तीन सुपुत्र, तसेच सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण औसा परिसरात आणि आध्यात्मिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *