Headlines

डोंगरयावलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड:9 जण ताब्यात, 5.90 लाखांचा मुद्देमाल जप्त




मोर्शी पोलिसांनी डोंगरयावली शेत शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्शी लगतच्या पाळा, सालबर्डी, डोंगरयावली परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. डोंगरयावली शेत शिवारातील निलेश बोपची यांच्या शेतात काही इसम पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत होते. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी छापा टाकला. यावेळी काही इसम ५२ ताशांच्या पत्त्यांवर ‘एक्का-बादशाह’ नावाचा जुगार खेळत होते. कारवाईदरम्यान एकूण नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकलींचा समावेश असून, त्याची एकूण किंमत अंदाजे ५ लाख ८८ हजार १४० रुपये आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोर्शी तालुक्यातील अमित केशवराव निमजे (वय ४०, रा. दापोरी), रूपेश मारोतराव बोराळकर (वय ३७, रा. डोंगरयावली), मोहन मुरलीधर मोहोड (वय ३६, रा. डोंगरयावली), शरद मधुकर माकोडे (वय ३७, रा. डोंगरयावली), निलेश बाबाराव इंगोले (वय ३५, रा. डोंगरयावली), शेख नईम शेख अहमद (वय ३४, रा. सालबर्डी), योगेश राजेश देशमुख (वय २७, रा. डोंगरयावली), आकाश रामदास खातरकर (वय ३२, रा. सालबर्डी, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश) आणि सागर विजयसिंग गहलोत (वय ३२, रा. सालबर्डी, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. दरम्यान, काही जुगारी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून, मोर्शी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोर्शी पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सुरेश कांबळे, स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते, अथर्व कोहळे आणि वैभव ठाकरे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *