Headlines

27 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या:वाढदिवसाच्या दिवशीच संपवले जीवन




तिवसा येथील गुरुदेव नगरमधील मंजुळा माता नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय शुभम अरुण राऊत या तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केली. दिंडेकर लेआऊट परिसरातील एका पडक्या विहिरीत रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस आणि जिल्हा शोध व नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शुभमचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. शुभमचा वाढदिवस २० ऑगस्ट रोजी होता. तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तो परिसरात परिचित होता. शुभमच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *