Headlines

चंद्रपूर महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 84 महिलांची फसवणूक!:आरोपीने 3 वर्षात कोट्यवधी उकळल्याचा संशय, एकाला अटक




चंद्रपूर महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 84 महिलांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा हा 250 पेक्षा अधिक असल्याचेही बोलले जात आहे. चंद्रपूर मानपात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने या महिलांची जवळपास लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समजते. मनपाच्या स्वच्छता विभागात भटकी कुत्री पकडणाऱ्या पथकात जितेंद्र सारसर नामक कर्मचारी कार्यरत असून त्यानेच स्वतःला वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत या महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. महानगरपालिकेत कंत्राटी मजूर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, ‘प्रोसेस फी’च्या नावाखाली अनेक महिलांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 84 पीडित महिलांनी तक्रार दाखल केली असली तरी, फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा 250 हून अधिक असल्याची आणि या घोटाळ्याची एकूण रक्कम तब्बल 3 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याची महिला साथीदार मंगला वानखेडे हिला अटक केली असून, सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शाळेत रागावल्याच्या क्षुल्लक कारणावरून चंद्रपुरातील 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल चंद्रपूर शहरात एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने मुख्याध्यापक रागावल्याच्या क्षुल्लक कारणातून गळफास घेत आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने शाळेच्या भिंतीवर काही मजकूर लिहिल्याने मुख्याध्यापकांनी तिच्या पालकांना शाळेत बोलावून तक्रार केली होती. मुख्याध्यापकांची भेट घेतल्यानंतर सर्वजण घरी परतले, मात्र त्यानंतर तिचे आई-वडील कामानिमित्त कोर्टात गेले असता, मागे मुलीने नैराश्यातून घरातील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी, रागावल्यासारख्या क्षुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलीने आपले आयुष्य संपवल्याने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. भंडाऱ्यात बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांचा डल्ला भंडाऱ्यातील तुमसर शहरात असलेल्या माकडे नगरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल लांबवल्याची मोठी घटना घडली आहे. घरी कोणीही नसल्याची संधी साधत दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटातील 8.50 लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग साकुरे आणि सेवानिवृत्त पालिका कर्मचारी युवराज कोहपरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरी करून पळून जाणारे हे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, या फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपींचा कसून शोध घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *