मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट आणि निर्वाणीचा इशारा दिला आहे. “आता मराठा समाजाला गोड बोलून फसवण्याचे दिवस संपले आहेत. 28 ऑगस्टच्
.
मराठा समाजाला किती दिवस वेड्यात काढणार?
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या वारंवार शिष्टमंडळे पाठवण्याच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली: “सरकारचे शिष्टमंडळ आल्यावर काय बोलते ते पाहू. मात्र, मराठा समाजाला आणखी किती दिवस वेड्यात काढणार आहात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे. प्रत्येक वेळी फक्त चर्चेला यायचे आणि वेळ मागायचा, हे आता चालणार नाही.”
“गेल्या 3 वर्षांत जी जी सरकारे आली, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आम्ही सन्मान ठेवला. मात्र, आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. सरकारचे शिष्टमंडळ केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी चर्चा करत आहे.”
नोंदी आणि गॅझेटची अंमलबजावणी करावीच लागेल
“ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांचे दाखले आणि हक्क सरकारला द्यावेच लागतील. हे सरकार आता अडवू शकत नाही. तसेच यासंदर्भातील गॅझेट लागू करावेच लागेल, हे आता सरकारच्याही लक्षात आले आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने 28 ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला नाही, तर 29 ऑगस्टपासून नियोजित आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
छगन भुजबळांवरही जरांगेंचा निशाणा
दरम्यान, जरांगे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. मराठा समाजाच्या सापडलेल्या नोंदींचा आधार आणि त्यामागील घटनात्मक तरतुदी भुजबळ यांच्या लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला.
मराठा समाजाला विरोध करत राहिल्यास त्याचे राजकीय नुकसान होऊ शकते, अशी जाणीव भुजबळांना झाल्याचेही जरांगे म्हणाले. “मराठ्यांना विरोध करून आपला काही फायदा नाही, अन्यथा अस्तित्व उद्ध्वस्त होईल,” असा दावा त्यांनी केला.
भुजबळ म्हणाले होते, ‘सरकार चर्चेतून मार्ग काढेल’
मनोज जरांगे यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी केलेले वक्तव्यही महत्त्वाचे ठरत आहे. भुजबळ यांनी यापूर्वी मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना, जरांगे यांची लढाई आपल्या विरोधात नसल्याचे म्हटले होते.
सरकार या विषयावर चर्चा करून निर्णय घेईल, असे भुजबळ यांनी सांगितले होते. ओबीसी समाजातील जातींची संख्या आणि जातगणनेच्या मागणीवरही सरकार काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
आपण यापूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यभर फिरलो होतो, त्यामुळे आपल्याला कोणाची भीती नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले होते. सरकार आपल्यासोबत असल्याने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिल्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हेही जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून संवादाचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे.
आज अंतरवालीत महत्त्वाची बैठक
मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे आज सोमवारी दुपारी दोन वाजता अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांनी सरकारमधील नेत्यांवर, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट टीका केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे दोन मंत्री थेट अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा करणार असल्याने या भेटीत काय तोडगा निघतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
याआधी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी रविवारी अचानक अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही योद्धा आहात. काही चुका झाल्या असतील किंवा गैरसमज झाला असेल तर चर्चा करून तो दूर करता येईल. त्यासाठी आधी चर्चा करावी लागेल,” अशा शब्दांत सत्तार यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी समाजाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही संजय शिरसाट आणि शिंदेसाहेबांवर जिवापाड प्रेम केले. मात्र मैत्रीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे. मैत्रीसाठी समाजाचे नुकसान होऊ देणार नाही,” अशी भूमिका जरांगे यांनी सत्तार यांच्यासमोर मांडल्याचे सांगण्यात आले. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर आता उदय सामंत आणि शंभूराज देसाई हेही जरांगे यांची भेट घेणार असल्याने सरकारकडून संवादाचे प्रयत्न वाढल्याचे दिसत आहे.
हेही वाचा…
सत्ताधाऱ्यांवर जरांगेंची नाराजी, सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न:अंतरवालीत आज महत्त्वाची बैठक; शिंदे गटाचे मंत्री, भाजप नेतेही भेटीला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिल्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हेही जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून संवादाचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी