Headlines

सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा गाभा; पण मार खाणार नाही:जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढू; संविधानाच्या चौकटीतील मागण्यांवर दारे उघडी- CM फडणवीस




सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हाच हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचा खरा गाभा अन् आत्मा आहे. हिंदूंच्या रक्तातच सहिष्णुता आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाचा मार खावा. कोणी हल्ला केला तर आम्ही प्रतिकार नक्कीच करू, पण हिंदू स्वतःहून कोणावरही हल्ला करत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हिंदू सभ्यता ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. जगभरातून अनेक आक्रमकांनी हल्ले केले, तरीही आपण आपली संस्कृती टिकवून ठेवली. इतकेच नव्हे, तर जगभरातून हाकलून लावलेल्या अनेक समाजांना आपण आपल्या संस्कृतीत सामावून घेतले आहे.
जरांगेंच्या आंदोलनावर सकारात्मक मार्ग काढू देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी सातत्याने चर्चेसाठी उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहेत. यापूर्वीही आपण चर्चा करून मार्ग काढले आहेत आणि यावेळीही सकारात्मक मार्ग काढू. ज्या मागण्या कायदेशीर, संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन न करणाऱ्या असतील, त्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारची दारे नेहमीच उघडी आहेत. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे हे आमचे कर्तव्यच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे हे आमचे कर्तव्यच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला एक महत्त्वाची शिकवण दिली आहे. जगात कुठेही भारतीय नागरिक संकटात अडकला असेल, तर भारत सरकार त्याच्या मदतीसाठी धावून जाते. याच धोरणानुसार आपण नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहोत. समृद्धीवरील घटनेची गांभीर्याने दखल देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, समृद्धी महामार्गावर घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणी तात्काळ स्पेशल टास्क फोर्स स्थापन करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

हे ही वृत्त वाचा

राष्ट्रवादी पक्ष एकच अन् तो शरद पवारांचाच:पक्षाची घटना डावलून आमच्यावर अन्याय झाला; सर्वोच्च न्यायालयात न्यायाची अपेक्षा- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ही शरद पवार यांनी केली आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष काढून घेण्यात आला. पक्षाचे संविधान बघितले तर हा आमच्यावर अन्याय करण्यात आला. या संदर्भात आमची सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. तो पक्ष शरद पवारांना परत करावा हीच आमची मागणी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *