Headlines

श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान:पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते चिंचवड येथे सोहळा




आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका श्रेया घोषाल यांना 21 वा आशा भोसले पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रेया घोषाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “संघर्ष आणि साधना म्हणजे आशाताई भोसले. अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील ‘सा’ देखील यांच्यामुळेच शिकले.” त्यांनी पुढे सांगितले की, आशाताईंची गाणी ऐकून त्यांना प्रेरणा मिळते आणि लवकरच पिंपरी चिंचवड शहरासाठी एक सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावर हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार अमित गोरखे, माजी महापौर योगेश बहल, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उद्योजक कृष्ण कुमार गोयल, नगरसेवक गौरव घुले, मानसी भोईर-घुले, वंदना घांगूर्डे, रुणाल सांकला, दिलीप काटकर, हर्षवर्धन भोईर, किरण येवलेकर, राजू बंग आणि गौरी लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारात रोख रु. 1,11,000/-, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह यांचा समावेश होता. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हे प्रदान करण्यात आले, तर पैठणी मानसी भोईर-घुले यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना देण्यात आली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी श्रेया घोषाल यांना आशीर्वाद देताना सांगितले की, “श्रेयाला मी लहानपणापासून ओळखतो. सर्वप्रथम षण्मुखानंद हॉलमध्ये माझेच गाणे गाताना मी तिला पाहिले होते आणि तेव्हाच तिला खूप छान गातेस असा आशीर्वाद दिला होता.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *