Headlines

'15 पैकी 12 मागण्या मान्य, याला न्याय देणे म्हणत नाहीत':मनोज जरांगे संतापले; एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्यांनाही दिला इशारा




मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 दिवस आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली. तसेच सरकार सकारात्मक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मात्र तरी देखील जरांगे यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना ज्या भाषेचा वापर केला त्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर जरांगे यांनी पलटवार केला आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविषयी एकेरी भाषा बोलू नये, असे उदय सामंत यांनी आव्हान केले होते. यावर जरांगे यांनी आपली भूमिका मांडात सांगितले की, चुकीच्याला चुकीचे म्हणू नको काय? तुम्ही आम्हाला दलाल म्हणून बोलायला ठेवले आहे का? तुमच्या मनगटात फक्त पैशाची ताकद आहे. शिंदेंनी चूक केली ती कबूल करा. एकनाथ शिंदेंना बोललो त्याचं वाईट वाटलं पण त्यांनी शिरसाठ्याचे ऐकून आमचे प्रमाणपत्र रद्द का केले? तर, राधाकृष्ण विखेंचे सोडून काहीही विचारा. मराठ्यांना याने अर्धवट फासावर सोडून दिले. हा फक्त आंदोलन कसे मोडले पाहिजे यांचे बघतो. फडणवीस, शिंदे यांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर हल्ला करता का? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, 15 पैकी 12 मागण्या मान्य, याला न्याय देणे म्हणत नाहीत. खाली ते मान्य केले जाते नाही, तुम्ही गरीबांचे वाटोळे केले. तुम्ही मराठा समाजाला पश्चाताप करण्याच्या उंबरठ्यावर आणले. तुम्हाला माहित नाही, मराठा समाज बाप आहे. समाजाला माहीत आहे, तुम्ही समाजाची पिळवणूक केली. तुम्ही शिष्टमंडळ म्हणून वेगळे बोलता, गाडीत बसल्यानंतर वेगळे बोलता, हॉटेलमध्ये असल्यानंतर वेगळे बोलता. तुम्ही काहीही मान्य केले नाही, 15 पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही, असे म्हणत सरकारने कुठलीही मागणी मान्य केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक दरम्यान, नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेतली, यावर विचारले असता मनोज जरांगे म्हणाले, चांगले आहे, मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. ते माझ्याबद्दल बोलल्यानंतर बघू. विखे पाटलांचा यांना आसरा असू शकतो. समाजाचा कुठे आसरा असतो का? हे लोक माझ्या विरोधात बोलले नाही, त्यामुळे मी पण त्यांना बोललो नाही, असे म्हणत विखे पाटलांची त्यांना साथ असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. भरत गोगावलेंच्या टीकेला पलटवार मंत्री भरत गोगावले यांनी मनोज जरांगे यांच्या भाषेवरून थेट इशारा दिला होता. एकेरी भाषेचा उल्लेख केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असे गोगावले यांनी म्हटले होते. यावर जरांगे म्हणाले, मी तयार आहे, कधीही सज्ज आहे, माझ्या नादाला लागायचे नाही. माझ्याकडे पुरावा आहेत. मीडियात पुरावा देईन. मी शिंदेंवर बोलणार आहे. तुम्ही मराठ्यांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या बाजूने बोलू नका. मग तुमच्यापेक्षा तटकरे बरा म्हणावा लागेल, असे जरांगे म्हणाले. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुम्हाला आरक्षण द्यायचा कंटाळा आला असेल आणि यावर त्यावर बोलू नका असे म्हणायचे असेल, तुम्ही फक्त कारण देत असाल तर शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये. आरक्षण द्यायच्या वेळी यांच्यावर बोलू नका, त्यांच्यावर बोलू नका असे सांगणे योग्य नाही. तुम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे नसतील तर येऊ नका. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करून संपून जाणार, तुम्ही काय करता तेही आम्ही बघू, असा पलटवार जरांगे यांनी केला आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मराठ्यांचे वाटोळे करून आता पळ काढताय?:’शिष्टमंडळ येणार नाही’ या विखे पाटलांच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांचा संताप “सरकारकडे जेवढे पर्याय होते तेवढे आम्ही केले, आता आमचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांकडे जाणार नाही. आता त्यांनीच सरकारला समजून घ्यावे,” या मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘सरकारला समजून घ्यायला सरकार काय आमचा बाप आहे का? मराठ्यांचे वाटोळे करायला उपसमितीचे अध्यक्ष झालात का?’ अशा जळजळीत शब्दांत जरांगे यांनी विखे पाटील आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. इथे सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *