![]()
पुणे आरटीओ चौकात ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील पाच वर्षांच्या मुलासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १७ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. गुलाब रामजी गावित (वय ३४, रा. चापापाडा, जि. नाशिक) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सुभाष रामजी गावित (वय ३२), अनिता सुभाष गावित (वय २८) आणि यश सुभाष गावित (वय ५) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारांपूर्वीच गुलाब गावित यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी सुभाष गावित यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या २६ जणांविरुद्ध गुन्हा मुंढवा परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या २६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.समाज माध्यमात मुंढवा भागात मोकळ्या जागेत काही जण मद्यप्राशन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली हाेती. मोकळ्या जागेत दररोज सायंकाळी मद्यपींची गर्दी होत होती. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुंढवा पोलिसांच्या पथकाने मोकळ्या जागेत मद्यप्राशन करणाऱ्या २६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम (८५), (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, गुन्हे शाखेचे निरीक्षक सागर गोडे, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, अशोक घेगडे, विनोद साळुंके, संभाजी शितोळे, चेतन गायकवाड, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर, विशाल बनकर, योगेश गायकवाड यांनी ही कारवाई केली. हेही वाचा.. पुण्यात नारायण पेठेत रुद्र सोसायटीतील इलेक्ट्रिक वाहनांना आग:सकाळी तळमजल्यावर धूर, अग्निशामक दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली
पुण्यातील नारायण पेठेत एका सोसायटीतील इलेक्ट्रिक दुचाकी आणि मोटारीला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सविस्तर वाचा
Source link
पुणे आरटीओ चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:पाच वर्षांच्या मुलासह तिघे गंभीर जखमी, ससून रुग्णालयात उपचार सुरू