Headlines

कला,विज्ञान महाविद्यालयात 55 विद्यार्थ्यांना पदवी वितरण:पदवी वितरण समारंभ‎ उत्साहात झाला संपन्न‎




येथील कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नारायण राणा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना अडसड (अक्का), नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, महाविद्यालयाचे संचालक सुरेश मुंदडा, माजी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील आखरे आणि महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य प्रा.डॉ. अजय अभ्यंकर यांचीही मंचावर उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातर्फे धामणगाव रेल्वे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अर्चना अडसड यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, “शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून जीवन घडवण्यासाठी अत्यावश्यक आहे,” असे सांगितले. नगराध्यक्ष अडसड यांनीही शिक्षण आणि समाज यांचा परस्पर संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांना समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. माजी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील आखरे, सचिव घनश्याम मेश्राम आणि प्राचार्य प्रा. डॉ. अजय अभ्यंकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पदवीचा समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कसा उपयोग करता येईल, यावर सविस्तर भाष्य केले. या समारंभात ५५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. हर्षा कांबे यांनी सुरेखरीत्या केले, तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर ताकसांडे यांनी मांडले. समारंभाच्या आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा संस्मरणीय ठरवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *