![]()
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. 2029 मध्ये बारामतीची जागा कुणी लढवायची, हा अजित पवार यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवर भाष्य केले. गुरुवारी बारा
.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकारने अजित पवार अपघात प्रकरणी उशिरा का होईना एफआयआर दाखल करायला पाहिजे होता. काँग्रेस सरकार असलेल्या राज्याने अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांच्या प्रयत्नाने एफआयआर दाखल करत अजित पवारांना न्याय दिला. रोहित पवारांच्या प्रयत्नांचे महत्त्व काँग्रेसने समजले. ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात त्याचा एफआयआर होत नाही हे दुर्दैवी आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी सरकार
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यंत्रणेच्या विरोधात ज्या प्रकारे लढत आहेत, त्याच बरोबर स्टॅलिन सुद्धा या यंत्रणेच्या विरोधात लढत आहेत. दिल्लीवरुन ज्या यंत्रणेच्या वापर करत विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि स्टॅलिन लढताना दिसून येत आहेत. त्या राज्यावर जो अन्याय झाला आहे, त्याविरोधात ही राज्ये लढत आहेत. आता जे दिसतंय त्यावर असे वाटते की केरळमध्ये काँग्रेसचे सरकार येईल. तामिळनाडूमध्ये डीएमकेचा मुख्यमंत्री बसेल. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार पुन्हा येईल. तर आसाममध्ये काँग्रेसने भाजपला टफ फाइट दिली आहे.
अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या!
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मतदान झाल्यावर मी नेहमीच काकींची भेट घेण्यासाठी येत असते. त्यांची तब्बेत बरी आहे. रेवतीच्या लग्नाची पत्रिका काकींना दाखवण्यासाठी मी आणि रेवती अजित पवारांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आमचे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सर्व जण एकत्रित लग्नाची तयारी करत आहोत. बारामतीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, त्यातून अजितदादांना श्रद्धांजली द्यावी.
जय पवारांचे वक्तव्य काय?
जय पवार म्हणाले की, 2029 मध्ये मी उमेदवार व्हावा, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकारणात नवा रंग भरला आहे.