![]()
शहरातील घराघरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमानुसार स्वच्छता कंत्राटदाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या घंटागाड्या दररोज संकलन करतात की नाही, यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घर, वसाहतींमध्ये क्युआर कोड लावण्यात आले आहेत. परंतु, कमी मनुष्यबळ, मर्यादित घंटागाड्या आणि अपुऱ्या साहित्याची बाब दडवण्यासाठी स्वच्छता कंत्राटदार नियमांची पायमल्ली करीत क्युआर कोड स्कॅनच करीत नाहीत. कारण, ते आठवड्यातून केवळ एक किंवा दोन दिवस, काही रहिवासी भागांमध्ये तर ८ ते १० दिवसांतून एकदाच घंटागाडीद्वारे कचरा संकलित करतात. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून घंटागाड्या क्युआर कोड स्कॅन करीत नसून हे नियमाचे उल्लंघन असले तरी ते सर्रास केले जात आहे. यासाठी मनपा सभागृहाने स्थापन केलेल्या स्वच्छता अभ्यास गटाने प्रति घटना प्रति दिवस १ हजार रु. दंडाची शिफारस केली आहे. मात्र, मनपा प्रशासन अजुनही, उर्वरित, पान.४ स्वच्छता कंत्राटदाराकडे प्रत्येक प्रभागात सरासरी ५४ स्वच्छता कामगार हवेत. तसेच कराराचा भाग अ व भाग ब मिळून एकूण १२५१ कामगार तसेच ५१८ वाहने असणेही अनिवार्य आहे.परंतु, स्वच्छता अभ्यास गटाला यात उणीव व अनियमितता आढळली आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ मनुष्यबळासह वाहने व साहित्याची उणीव भरून काढण्यासोबतच धुवारणी व फवारणीही करण्याची मागणी केली आहे. कागदावर बळ : प्रत्यक्षात बोंबाबोंब! कंत्राटाच्या अटींनुसार, प्रत्येक प्रभागात ५४ स्वच्छता कामगार असणे अनिवार्य आहे. करारातील भाग ‘अ’ आणि ‘ब’ मिळून एकूण १२५१ कामगार आणि ५१८ वाहने असणे गरजेचे असताना, साहित्याचा मोठा तुटवडा आहे. मनपाची ‘अभ्यासगिरी’: कारवाई कधी? स्वच्छता कंत्राटदाराच्या कामावर बारकाईने लक्ष असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी स्थिती ‘जैसे थे’ आहे. अभ्यास गटाने अहवाल देऊनही प्रशासन तो ‘बघत’ असल्याचे सांगून कारवाई टाळत आहे. कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. डॉ. अजय जाधव, स्वच्छता अधिकारी, मनपा. ‘डिजिटल’ खेळ : क्यूआर स्कॅन होत नाही स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. दररोज कचरा संकलन होत नसल्याने, आपली ‘पोलखोल’ होऊ नये म्हणून घंटागाडी कर्मचारी मुद्दाम क्यूआर कोड स्कॅनिंग टाळत आहेत. दणका : कंत्राटदारावर दंडाची तलवार मनपाने स्थापन केलेल्या १९ सदस्यीय सर्वपक्षीय स्वच्छता अभ्यास गटाने कंत्राटदाराच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. शहराचे कंत्राट घाईत आणि पूर्वनियोजन न करता देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभ्यास गटाच्या अहवाल बघितल्यानंतरच कारवाई ^स्वच्छता अभ्यास गटाने आमसभेत अहवाल सादर केला आहे. परंतु, तो बघितला नाही. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरने आधीच्या तुलनेत कामात सुधारणा केली असली तरी ती समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळेच अहवाल बघितल्यानंतरच त्यांच्या कामात त्रुटी आढळल्यास निश्चितच कारवाई होणार. वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा. शहर स्वच्छतेचे कंत्राट देण्याचा घाईने घेतलेला निर्णय शहर स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट देण्याचा मनपा प्रशासनाने अत्यंत घाईने निर्णय घेतल्याचे निरीक्षण मनपा सभागृहाद्वारे सभागृह नेते चेतन गावंडे यांच्या नेतृत्त्वात स्थापन केलेल्या १९ सदस्यीय सर्वपक्षीय स्वच्छता अभ्यास गटाने नोंदवले आहे. अभ्यास गटात सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, गटनेते नाना आमले, शेख हमीद शेख वाहद, डॉ. राजेंद्र तायडे, सदस्य नगरसेवक अनिल अग्रवाल, अॅड. प्रशांत देशपांडे, दिनेश बुब, संजय नरवणे, मिलींद चिमोटे, बबलू शेखावत, प्रशांत वानखडे, मंगेश मनोहरे, भोजराज काळे, अजय जयस्वाल, नजीब खान, नूतन भुजाडे व सुरेखा लुंगारे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. प्रत्येक प्रभागामध्ये हवेत ५४ कामगार
Source link
क्यूआर कोड स्कॅन बंद; शहर ‘कचराकुंडी':स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमाची पायमल्ली, स्वच्छता अभ्यास गटाने केली दंडाची शिफारस