![]()
चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने २९ एप्रिल रोजी होणाऱ्या अशोक पर्व महोत्सवात सर्वजातीय उपवर-वधूंची नोंदणी होणार आहे. राज्यस्तरीय या महोत्सवात यंदा सामाजिक दायित्वाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. प्रबोधन, सांस्कृतिक
.
समाजातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सर्वजातीय उपवर-वधू नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नोंदणीमध्ये सर्व जातीय उपवर-वधू-वरांना संधी देण्यात येणार आहे. विवाहयोग्य विधवा, विधुर, घटस्फोटीत यांचीही नोंदणी करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपानंतर आबासाहेब खेडकर सभागृहात या नोंदणी प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार असून इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
संपूर्ण माहिती अशोक प्रतिष्ठानकडे देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशोक पर्व समितीच्या बैठकीत हा समाजोपयोगी निर्णय घेण्यात आला. अशोक पर्व महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशीलता जपत ठोस उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे सामाजिक दायित्व अधोरेखित होत आहे. बैठकीला अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले, पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे आदी उपस्थित होते. भारतीय इतिहासातील सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक हे भारतीय अस्मितेचे जिवंत प्रतीक असून त्यांच्या कार्याची होत असलेली उपेक्षा थांबवण्यासाठी ‘अशोक पर्व’च्या चळवळीत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रभावी आवाहन खासदार बळवंतराव वानखडे यांनी केले. ते राज्यस्तरीय ‘अशोक पर्व’ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते. सम्राट अशोक यांनी भारतात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणत लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची स्थापना केली, असे खा. वानखडे म्हणाले. जनतेच्या हितासाठी स्वतःचे संपूर्ण जीवन समर्पित करणारे ते जगातील पहिले कल्याणकारी शासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारांचे प्रतीक असलेले अशोक चक्र आणि अशोक स्तंभ आपण राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले असले तरी त्यांच्या कार्याची योग्य दखल आजही घेतली जात नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली.
लढ्यात सामील व्हा : खासदार वानखडे