पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोषी कोणताही असो, चौकशी करून कारवाई केली जाईल; मात्र संजय राऊतांना भ्र
.
आज सकाळीच खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला आहे. नियमानुसार, ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी ‘ई-निविदा’ प्रक्रिया राबवणे बंधनकारक असते. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या नियमाला पूर्णपणे केराची टोपली दाखवत, सोलापूरच्या ‘जगदंबा रेडीमेड ड्रेसेस सहकारी संस्थेला’ कोट्यवधी रुपयांचे काम परस्पर देऊन टाकले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. यावर आता भाजपने पलटवार करत प्रत्युत्तर दिले.
‘महाविकास आघाडीने भाजप आमदारांना निधी दिला नव्हता’
विकासनिधीच्या मुद्द्यावरूनही बन यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या काळात भाजपच्या 105 आमदारांना एक रुपयाचाही निधी देण्यात आला नव्हता, असा आरोप त्यांनी केला. मात्र त्यानंतरही भाजपचा एकही आमदार पक्ष सोडून गेला नाही. “माणसं पैशामुळे फुटत नाहीत, प्रेम आणि आपुलकीमुळे जोडली जातात,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली.
‘महाविकास नव्हे, महाविनाश आघाडी’
उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना भेटत नाहीत, तर संजय राऊत सातत्याने स्वतःच्या पक्षातील लोकप्रतिनिधींवरही टीका करतात. त्यामुळेच अनेक लोक पक्ष सोडून गेले असून भविष्यातही महाविकास आघाडीतील अनेक नेते त्यांची साथ सोडतील, असा दावा बन यांनी केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडी ही महाविकास नसून महाविनाश आघाडी आहे. या आघाडीकडे कोणताही समान अजेंडा किंवा विचार नाही. एकमेकांवर टीका करणे आणि शिवीगाळ करणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे.”
नांदेड पुलाच्या मुद्द्यावरही स्पष्टीकरण
नांदेडमध्ये पूल कोसळल्याचा आरोप फेटाळताना बन म्हणाले की, पूल कोसळलेला नसून केवळ एक छोटी संरक्षक भिंत कोसळली आहे. तिची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून या कामात कोणताही गैरव्यवहार झाला असल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सचिन वाझे प्रकरणावरूनही टीका
संजय राऊत यांनी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचाही बन यांनी समाचार घेतला. त्यांनी विचारले, “सचिन वाझे यांचा वापर तुम्ही घरगडी म्हणून केला होता का?” तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केली होती, असा आरोप करत पोलिसांचा अपमान करू नये, असेही त्यांनी म्हटले.
हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधींवरही निशाणा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसची मोठी पडझड झाली आहे. तर राहुल गांधींनी देशातील काँग्रेसचे नुकसान केल्याचा आरोप करत त्यांना “डिझास्टर मॅन” असे संबोधले.
संबंधित बातमी वाचा…
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा?:संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावेही जोडले आहेत. “न खाऊंगा, न खाने दूंगा, हे पंतप्रधानांचे वाक्य प्रेरणादायी आहे, पण या व्यवहारात तुमच्याच मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने पालिकेवर दबाव आणून ५० ते ५५ कोटी रुपयांची टक्केवारी खाल्ली आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी या पत्रात केला आहे. या प्रकरणावर कारवाई झाली तरच नवल वाटेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर

राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण यांनी केले आहे. या दाव्यामुळे महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 8 जागा जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा..