![]()
नाशिक महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले. उदय सामंत यांच्या दाव्यानंतर नाशिक महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही, आम्ही सर्वजण वज्रमुठीसारखे एकत्र आहोत. नाशिकमध्ये जाणीवपूर्वक केवळ संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. सध्या उपमहापौर पदाचा सौदा केला जात असून, ज्यांना उपमहापौर बनायचे आहे ते एजंट पाठवून आमच्या नगरसेवकांना 5 कोटींच्या प्रभाग निधीचे आमिष दाखवत आहेत. तर आतापर्यंत आमच्या 5 ते 6 नगरसेवकांशी असा संपर्क साधण्यात आला आहे. विकासकामांसाठी जाणीवपूर्वक अडवणूक केशव पोरजे म्हणाले की, आमच्या प्रभागांतील विकासकामांसाठी जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असून आम्ही मनपा आयुक्तांना निधी देण्याबाबत निवेदन दिले आहे. ज्याप्रमाणे आमचे खासदार फुटले तेव्हा ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्यात आले, तसेच आता या दलालांविरोधात नाशिकमध्ये ‘ऑपरेशन तुडवा’ राबवू, एक वकील असलेला एजंट, ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचे आहे आणि जो सध्या कोणत्याही पक्ष संघटनेत नाही, तो आमच्या नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांना फूस लावण्याचा प्रयत्न करत आहे. 13 नगरसेवक होते उपस्थित नाशिक महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आजच्या या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते. तर, नगरसेविका मंगला आढाव यांच्या सासूचे आणि मुरलीधर भामरे यांच्या चुलत्यांचे निधन झाल्यामुळे कौटुंबिक कारणास्तव हे दोघे उपस्थित राहू शकले नाहीत. संबंधित वृत्त वाचा नाशिकच नाही, संपूर्ण राज्यातील अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार:उदय सामंतांचा मोठा दावा, खडसे-तावडे भेटीवरही केले भाष्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. याचवेळी, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या भेटीवरही सामंत यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया नोंदवली आहे. वाचा सविस्तर
Source link
आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही:निधीची अडवणूक सुरू, 5-6 जणांशी संपर्क साधणारे एजंट उघडे पाडू- केशव पोरजे