Headlines

नागपुरातील गोधनी येथे क्लोरीन गॅस गळती:56 जण बाधित, प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला




नागपूरजवळील गोधनी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपरिषद अंतर्गत असलेल्या वॉटर ट्रिटमेंट प्लांटमध्ये आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास क्लोरीन गॅस गळतीची घटना घडली. ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलिंडरमधून ही गळती सुरू झाली, ज्यामुळे आजूबाजूच्या वस्तीत गॅस पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे ५६ नागरिक बाधित झाले असून, त्यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व इतर बाधित नागरिकांना उपचारासाठी तात्काळ शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. एकूण ५६ बाधितांपैकी ४५ रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत, तर ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. प्रशासनाने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळल्याने गोधनी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेची माहिती मिळताच मनपाचा अग्निशमन विभाग दोन वॉटर टेंडर आणि ब्रीदिंग ऑपरेटरसह घटनास्थळी पोहोचला. मदतीसाठी ओसीडब्ल्यूचे कर्मचारी आणि एनडीआरएफची चमूही बोलावण्यात आली. एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल आणि ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास गळतीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर धोकादायक क्लोरीन सिलिंडर कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्याच्या टाकीमध्ये सुरक्षितपणे टाकण्यात आला, ज्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. बाधित ५६ नागरिकांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये स्पर्श हॉस्पिटल, झिंगाबाई टाकळी येथे १३ रुग्ण (७ दाखल, ६ ओपीडी), मॅक्स हॉस्पिटल, मानकापूर येथे १३ रुग्ण (सर्व १३ दाखल, त्यापैकी ४ प्रकृती गंभीर/आयसीयूमध्ये), आणि मेयो हॉस्पिटल येथे १७ रुग्ण (सर्व १७ दाखल, त्यापैकी २ प्रकृती गंभीर/आयसीयूमध्ये) यांचा समावेश आहे. तसेच, ऑलराईट हॉस्पिटल, मानकापूर येथे ११ रुग्ण (६ दाखल, ५ जणांना डिस्चार्ज), तर किंग्स वे हॉस्पिटल आणि विवेका हॉस्पिटल येथे प्रत्येकी १ गंभीर रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहे. हेही वाचा.. अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग:3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर धूर पसरला. त्यावेळी NICU मध्ये 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *