Headlines

तीव्र उन्हामुळे करा पालेभाज्या, फळांचे सेवन:उन्हाळ्यात महिला, लहान मुलांना ऊन लागण्यासह बळावतात इतर आजार‎




उन्हाच्या झळांमुळे उष्माघाताची शक्यता असल्याने आहारतज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ व महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी दहा वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उकाडा असह्य होत आहे. यामुळे या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तीव्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान ४५ अंशांच्या घरात प्रवेश केला आहे. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, उलट्या, ताप, अशक्तपणाच्या तक्रारी वाढत आहेत. शहरातील लहान दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, दुपारच्या कडक उन्हात जास्त वेळ उभे राहणे टाळावे. श्रमाची कामे करणे टाळावे. उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे टाळावे. लगेच थंड वातावरणात जाणे टाळावे. घरात खिडक्या उघड्या ठेवाव्यात. हवेशीर वातावरण ठेवावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. वाहनांमध्ये मुलांना एकटे सोडू नये. पाळीव जनावरांसाठीही सावली व पाण्याची व्यवस्था करावी. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणाला चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप वाढणे, किंवा बेशुद्ध पडणे आदी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. असे सांगण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये व विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना उन्हापासून संरक्षणाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. चहा, कॉफी, कार्बोनेटेड पेय टाळा चहा किंवा कॉफी, तळलेले, अती तिखट पदार्थ, कार्बोनेटेड पेय, शीतपेये टाळावे. तुकतुकीतपणा टिकवण्यासाठी कतीरा डिंक, काळ्या मनुका पाण्यात भिजवून खाव्या. ताजे जेवण घ्यावे, आहारात सलाद, पालेभाज्या, फळे, ताक, कोकम सरबत, सब्जा, नारळ पाणी, धने पाणी आदींचा समावेश करावा. एसी, कुलरमध्ये पाणी पिणे विसरू नका उन्हाच्या झळा प्रचंड आहेत. आरोग्याची काळजी आवश्यक आहे. थंडपेय घ्यावे. महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. महिलांमध्ये ऊन लागण्याचे, मूत्रसंसर्गाचे आजार बळावतात. एसी, कुलरमध्ये राहताना पाणी पिण्यास विसरू नये. बाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. हर्षदा देव- देशपांडे, आहारतज्ज्ञ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *