![]()
हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे एका विवाह सोहळ्यात बूट लपवल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. नवरदेवाकडील वऱ्हाडींनी चक्क खंजीर काढून वधूकडील दोघांवर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी वसमत तालुक्यातील गिरगाव येथून नवरदेवाकडील मंडळी आली होती. लग्न लागण्यापूर्वी बूट लपवल्यामुळे दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र लग्न लागल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळला. वधूकडील गणेश डाळ यांना मारहाण सुरू केली. तसेच संशयितांनी खंजीरने गणेश यांच्या पोटात सपासप वार केले. भांडण सोडवण्यासाठी गेलेले श्रावण गाढवे यांच्यावरही खंजीरने हल्ला करण्यात आला. पण संसार वाचला… या भयंकर घटनेमुळे लग्नघरात गोंधळउडाला. आनंदी वातावरणात रक्ताचा सडा पडल्याने आणि वऱ्हाडींच्या या जीवघेण्या कृत्यामुळे लग्न मोडण्याचीच वेळ आली होती. मात्र, काहींनी मध्यस्थी केल्याने विवाह मोडता मोडता वाचला. शिरपूरला भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात मामाकडून गोळीबार; तीन जण जखमी प्रतिनिधी | शिरपूर ( जि.धुळे) – भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात मामाने गोळीबार केल्याने पाहुण्यासह तिघे जखमी झाले. ही घटना भगतसिंगनगर परिसरात घडली. गोळीबारानंतर लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. काही वर्षांपूर्वी बहिणीने केलेली आत्महत्या व जमिनीच्या हव्यासापोटी गोळीबार केल्याचे समोर अाले आहे. या प्रकरणी मुख्य संशयित मामा सागर पाटीलसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप पाटील यांच्या मुलीचा २७ एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम होता. दुपारी साडेचारला ते मित्रांसोबत दुचाकीने पाहुण्यांना आणण्यासाठी गेले होते. तेव्हा शालक सागर पाटील व साथीदारांनी त्यांना अडवून गोळ्या झाडल्या.
Source link
‘जूते दो, पैसे लो’च्या मस्करीत खंजिराचे वार:चौघांनी वधूकडील दोघांना भोसकले; हिंगोलीच्या कळमकोंडात बूट लपवल्याच्या घटनेचा राग, लग्न मोडता मोडता वाचले