Headlines

हिंदू महिलांच्याच बाबतीत सिझेरियनचे प्रमाण जास्त का?:कालीचरण महाराजांचा 'डिलिव्हरी जिहाद'चा आरोप, डॉक्टरांच्या हेतूवर शंका




आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे कालीचरण महाराज यांनी आता डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. “देशात ‘डिलिव्हरी जिहाद’ सुरू असून यामध्ये हिंदू डॉक्टरच आघाडीवर आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हिंदू महिलांच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण हे डॉक्टरांनी पैशांसाठी रचलेले एक मोठे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील दौंड येथे आयोजित ‘हिंदू विराट सभे’त बोलताना कालीचरण महाराज यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रसूती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हिंदू महिलांच्या पहिल्या प्रसूतीवेळी डॉक्टर मुद्दाम सिझेरियनचा मार्ग अवलंबतात. हिंदू बालकांच्याच गळ्यात नाळ कशी अडकते? हिंदूंचीच मुले आडवी कशी जन्माला येतात? केवळ हिंदू महिलांच्याच बाबतीत सिझेरियनचे प्रमाण जास्त का आणि मुस्लिम महिलांच्या बाबतीत ते कमी का?” असा सवाल कालीचरण महाराज यांनी उपस्थित केला. डॉक्टरांवर पैशांसाठी षडयंत्राचा आरोप कालीचरण महाराजांनी या प्रक्रियेला ‘डिलिव्हरी जिहाद’ असे नाव दिले असून यात हिंदू डॉक्टरांचा मोठा सहभाग असल्याचे म्हटले आहे. “जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी डॉक्टरांकडून हे षडयंत्र रचले जात आहे. या माध्यमातून हिंदू समाजाला आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या भाषणातून केला. वैद्यकीय क्षेत्रात संताप उमटण्याची शक्यता कालीचरण महाराजांनी कोणत्याही शास्त्रीय आधाराशिवाय थेट डॉक्टरांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला ‘जिहाद’शी जोडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांनी विविध विषयांवरून वाद ओढवून घेतला असून, आता थेट आरोग्य व्यवस्थेवरच आरोप केल्याने नवा कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *