![]()
सर्व जनतेला सर्व सेवा ऑनलाईन देण्यावर शासनाचा भर असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या योजना या सर्वांसाठी आहेत. आपण ज्या योजनेसाठी पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. यासाठी महसूल विभाग आपल्या सेवेसाठी तत्पर असून काहीही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले. यावेळी विविध योजनेतील ५० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तालुक्यातील मानूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज गाव भेट समाधान शिबिर प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. संजय पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय बंगाळ, ग्रामपंचायत सदस्य परशुराम पवार, मंडळ अधिकारी विजय हिरे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र त्वरित तयार करून घ्यावे, नागरिकांनी आरोग्य कार्ड तयार करून घ्यावे. शिधापत्रिका अपडेट करून घ्यावी. शेती अकृषिक करण्यासाठी सहकार्य मिळेल. तसेच आपल्याला काहीही अडचण असल्यास तालुका विभागाला कळवावे. आम्ही आपली अडचण सोडविण्यासाठी पुन्हा तुमच्या गावात येऊ असे तहसीलदार यांनी सांगितले. डॉ. अभय बंगाळ यांनी सांगितले की, वय वर्ष १४ ते १५ असणाऱ्या मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस देणे सुरू असून, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींना ही लस लवकरात लवकर देवून घ्यावी. तसेच आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘ माझे गाव निरोगी’ या शासकीय योजनेत प्रत्येक गावाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी तलाठी अविनाश पवार यांनी प्रास्तविक केले. तुषार बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. नितीन महाजन, गजेंद्र पवार, प्रभाकर बोरसे, बाजीराव सूर्यवंशी आदींसह महसूल, आरोग्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केलेली वाटप कागदपत्रे आयुष्यमान कार्ड वाटप – १० सामाजिक अर्थसहाय्य योजना – १५ फेरफार पत्रक – २५ नागरिकांनी गाव भेट शिबिराचा लाभ घ्यावा शासनाने सुरू केलेल्या गावभेट योजनेअंतर्गत सर्वांनी सहभागी व्हावे. शासनाचे कर्मचारी आपल्या गावात आपल्या अडचणी सोडविण्यासाठी येत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या गाव भेट शिबिराचा लाभ घ्यावा. – कश्मीरा संख्ये, प्रांताधिकारी
Source link
मानूरला 50 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप:शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबिर