![]()
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील काळू धरणावरील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीने साडे चारशे कोटी रुपये पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे रोजी घोषित केले आहे. शेतकरी या प्रकल्पासाठी जमीनी द्यायला तयार आहेत. वा
.
राजू शेट्टी म्हणाले की, शहरातील लोकांना पाणी देण्यास आम्ही तयार आहोत, पण 14 टीएमसीचे मोठे धरण बांधण्याऐवजी छोटे, छोटे बंधारे बांधावे त्यातून थोडे पाणी तुम्ही शेती आणि पिण्यासाठी द्या, बाकी सर्व पाणी तुम्ही ठाणे आणि कल्याणला न्या, त्याला आमचा विरोध नाही. पण आमची गावे बुडवून आम्हाला बेघर करत भूमिपुत्रांची राख रांगोळी करत ठाण्यात जे बाहेरचे लोंढे आले आहेत त्यांना पिण्याचे पाणी देणार असाल तर ते कदापी सहन करणार नाही.
स्थानिक नेत्यांकडून पैसा कमावण्याचा धंदा
राजू शेट्टी म्हणाले की, मी या गावात दौरा केला असून मला शेतकऱ्यांच्या व्यथा माहिती आहे. हे 14 टीएमसी पाणी साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक 2हजार हेक्टर जमीनी पाण्याखाली जाणार आहेत. त्या जमीनीच्या बदल्यात तुम्ही काही जमीन देणार नाही. केवळ पुनर्वसन करायचे म्हणत मुरबाड तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी जमीनी घेतल्या आहेत, त्या सरकारला चढ्या भावाने विकायच्या आहेत. अन् तिथे गावकऱ्याचे पुनर्वसन करायचे आणि अमाप पैसा मिळवायचा हा धंदा सुरू आहे.
भूमिपुत्रांनी काय भीक मागायची का?
राजू शेट्टी म्हणाले की, हे सर्व करत धरण पूर्ण देखील झाले तरी शेतकऱ्यांना त्या धरणातील एक थेंब पाणीसुद्धा मिळणार नाही. शेतकरी सोडून द्या, ज्या 19 गावामधील लोकांच्या जमीनी जाणार आहेत त्यांना सुद्धा या धरणातील एक थेंब पाणी पिण्यासाठी मिळणार नाही. धरण उशाला आणि कोरड धशाला अशी अवस्था शेतकऱ्यांची होणार असेल तर मग भूमिपुत्रांनी काय करायचे भीक मागायची का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
जमीनी खरेदीस परवानगी मिळालीच कशी?
राजू शेट्टी म्हणाले की, काळू धरणाचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर सुद्धा जमीनीच्या खरेदी विक्री झालेली आहे. त्या कुठल्या आधारे झाल्या. खरेदी करणारे कोण आहेत, त्याची एक श्वेतपत्रिका सरकारने काढली पाहिजे.मुळात जमीनी खरेदी करण्यास परवारगी मिळालीच कशी? हा सर्व पैसे कमावण्याचा धंदा आहे, असा आरोप शेट्टींनी केला आहे.