![]()
आजच्या डिजिटल युगात जिथे बालपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवत चालले आहे, तिथे सावेडीतील महापौर उद्यानाने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. निमित्त आहे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘समर कॅम्प’चे. रणरणत्या उन्हातही सायंकाळच्या
.
टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सच्या आभासी जगातून बाहेर काढून मुलांना पुन्हा एकदा मातीच्या खेळात रमवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथे केवळ खेळच नाहीत, तर शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावनेचे धडेही दिले जात आहेत. मैदानी खेळांसोबतच जिजाऊंचे संस्कार आणि शिवरायांचा धगधगता इतिहास गोष्टींच्या रूपाने मुलांसमोर उलगडला जात आहे.
सावेडी गावातील हा उपक्रम केवळ करमणुकीचे साधन न ठरता, मुलांच्या सर्वांगीण विकासाचे एक प्रभावी केंद्र बनले आहे.
या उपक्रमात बाबासाहेब वाकळे स्वतः मुलांमध्ये मिसळून खेळांचा आनंद घेत आहेत. मुलांनी सुदृढ आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगावे, यासाठी त्यांना मैदानी खेळांची गोडी लावणे ही काळाची गरज आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. खेळांमुळे शरीर आणि मन दोन्ही सक्षम होत असल्याचे या शिबिरातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
खेळांतून व्यक्तिमत्त्व विकास या समर कॅम्पमध्ये मुलांसाठी कसरतीचे आणि कौशल्याचे विविध खेळ आयोजित केले आहेत. यात ॲथलेटिक्स, रोप मल्लखांब, हॉर्स रायडिंग, दांडपट्टा आणि सेल्फ डिफेन्सचे खास प्रशिक्षण दिले जात आहे. या साहसी खेळांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि त्यांचे शारीरिक आरोग्य सुदृढ होण्यास मोठी मदत होत आहे.