Headlines

गुजरातमधील 2002 च्या पॅटर्ननुसार देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र:हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप




भारतीय जनता पक्ष २०२९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभर धार्मिक तेढ निर्माण करत असून, २००२ च्या गुजरात दंगलींप्रमाणेच हिंसाचार घडवण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला. पाच राज्यातील निवडणुकीनंतर काही राज्यांत सुरू झालेला हिंसाचार हा याच मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर अनेक गंभीर प्रश्नांची सरबत्ती केली. सपकाळ यांनी जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेवर भाष्य करताना सांगितले की, “जानेवारी २०२८ मध्ये सुरू होणाऱ्या डिलिमिटेशन प्रक्रियेसाठी कोणत्या निवृत्त न्यायाधीशाला समितीत घ्यायचे, हे भाजपने आधीच ठरवले आहे. इतकेच नाही, तर पुनर्रचनेनंतरचा मतदारसंघांचा नकाशाही आत्ताच तयार आहे. ही सर्व प्रक्रिया लोकशाहीला पायदळी तुडवणारी आहे. तामिळनाडूतील ‘टीव्हीके’ला पाठिंबा तामिळनाडूतील राजकीय समीकरणांवर बोलताना त्यांनी जोसेफ विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाला दिलेल्या पाठिंब्याचे समर्थन केले. “स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची निवडणुकीपूर्वीच आघाडीची इच्छा होती. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षांसोबत उभे राहण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले. भाजपच्या भ्रष्टाचारावर बोचरी टीका मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ यांनी शेलक्या शब्दांत भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले: भ्रष्टाचारासाठी भाजपला आता शौचालयाची जागाही कमी पडत आहे. आधी सुलभ शौचालयात भ्रष्टाचार केला आणि आता मनपाच्या कामातही तेच सुरू आहे. भाजपमध्ये मोहित कंबोज यांच्यासारख्यांना मलिदा मिळतो आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या नशिबी मात्र शौचालयाची जागा येत असल्याचेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *