Headlines

कौैठा:बालाजी देडगाव येथे हरिनाम सप्ताहाची सांगता




नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे संत नामदेव महाराज व संत सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी स्वामी प्रकाशानंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात झाली. सप्ताहाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, नामांकित कीर्तनकारांची कीर्तने व हरिनाम संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हरिनामाचा गजर केला. सांगता सोहळ्यानिमित्त स्वामी प्रकाशानंद महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे तसेच संतांच्या विचारांचे सुंदर विवेचन केले. त्यांनी उपस्थित भाविकांना भक्ती, सदाचार, एकोपा आणि समाजसेवेचा संदेश देत दहीहंडी फोडत सर्वांना काला वाटण्यात आला. बुधवारी गावात फटाक्यांची आतशिबाजीमध्ये भव्यदिंडी सोहळा पार पडला. दिंडीत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. हरिनामाच्या गजराने गावात नवचैतन्य निर्माण झाले होते. यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तर कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *