![]()
शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असून देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल 40% शेतकरी आत्महत्या एकट्या राज्यात होत आहेत. 2024 मध्ये देशात शेतकरी आणि शेती व्यवसायावर आधारीत 15,179 जणांनी आत्महत्या केल्या. पैकी 6093 एकट्या महाराष
.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (एनसीआरबी) चा ॲक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाइड्स इन इंडिया हा 2024 चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. ‘दिव्य मराठी’ने अहवालाचे सखोल विश्लेषण केले असता यातून शेतकरी आत्महत्यांविषयी धक्कादायक माहिती समोर आली. अहवालानुसार 2024 मध्ये देशभरात विविध प्रकारच्या 170746 आत्महत्या झाल्या. यात 10, 546 शेतकरी व शेतमजूर तर 4,633 शेती व्यवसायावर आधारित अशा एकुण 15,179 जणांनी आत्महत्या केल्या. देशाच्या एकुण आत्महत्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण 11.24% आहे. यात अजून गंभीर बाब म्हणजे देशातील एकूण शेतकरी आत्महत्यापैकी सर्वाधिक 6,093 महाराष्ट्रात झाल्या आहेत.
सर्वाधिक 16.2% अपघाती मृत्यूही महाराष्ट्रात
वर्षभरात 75, 807 अपघाती मृत्यूसह महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशाच्या लोकसंख्येत 9.1% वाटा असणाऱ्या राज्यात वर्षभरातील एकूण अपघातांपैकी 16.2% अपघात झाले. तर लोकसंख्येत 17% वाटा असणारा उत्तरप्रदेश 42,987 अपघातांसह (एकूण अपघातांच्या 9.2%) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ मध्यप्रदेश (9.8%), तामिळनाडू (7.2%), कर्नाटक (6.6%), राजस्थान (6.6%), गुजरात (5.1%), ओडीसा (5%), बिहार (4.2%) तर हरियाना 3.9% अपघातासह दहाव्या क्रमांकावर आहे. पैकी सर्वाधिक (42%) मृत्यु रस्ते अपघातात झाले. त्या पाठोपाठ आकस्मिक निधन (16.2%), पाण्यात वाहून मृत्यु (8.6%), घसरून मृत्यु (5.7%) तर विषबाधेमुळे 4.6 टक्के मृत्यु झाले.
देशात एकही मोठा रेल्वे अपघात नाही
2024 मध्ये देशभरात एकही मोठा रेल्वे अपघात झाला नाही. मात्र, रेल्वे रूळांवर प्रवासी धडकण्यासारख्या 25,397 घटना घडल्या. पैकी 5781 घटना (22.8%) महाराष्ट्रात तर 3547 घटना (14%) उत्तरप्रदेशात नोंदवल्या. या अपघातात महाराष्ट्रात 3,587 तर उत्तरप्रदेशात 3,528 प्रवाशांनी जीव गमावला. सर्वाधिक अपघात सकाळी 6 ते 9 दरम्यान झाले. या दोन राज्यांनंतर पश्चिम बंगाल आणि केरळचा क्रमांक लागतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ठरतोय सुसाइड कॅपिटल एनसीआरबीच्या अहवालाचे विश्लेषण गुजरातमध्ये 5.1% अपघात
15 राज्यांत एकही शेतकरी आत्महत्या नाही. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक 4741 शेतकरी आत्महत्या शेजारील कर्नाटकमध्ये झाल्या. यानंतरच्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील प्रमाण तुरळक आहे. तर अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मणिपूर, नागालँड, तेलंगण, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, चंडीगड, दिल्ली, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये एकही शेतकरी आत्महत्या नाही, हे विशेष.