Headlines

संमेलन म्हणजे नाथांची सेवा ही गावोगावी पोहोचवण्याची सुरुवात:निफाडमध्ये नवनाथांच्या जयघोषाने दोन दिवसीय भक्तीच्या महाकुंभाची सांगता‎



त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व निफाड येथील केंद्राच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय संमेलनात अवघे निफाड ‘नाथमय’ झाले होते. “हे संमेलन म्हणजे नाथांच्या सेवेची सांगता नसून, गावोगावी ही सेवा पोहोचवण्याची ही तर फक्त सुरुवात आहे

.

वैनतेय विद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाथभक्त, दत्तभक्त आणि श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील हजारो सेवकांच्या उपस्थितीने या सोहळ्याला महाकुंभाचे स्वरूप प्राप्त झाले होते. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध व्याख्याने, भक्तिसंगीत, पारायण आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून नाथ संप्रदायाचा गौरव करण्यात आला. समन्वयक मिलिंद महाराज चवंडके आणि स्वागताध्यक्ष वि. दा. व्यवहारे यांच्या नियोजनाखाली हा सोहळा पार पडला.

यावेळी आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष कांताबाई कर्डीले आदी उपस्थित होते. संमेलनाचा दुसरा दिवस हा पूर्णपणे साधनेला आणि सामुदायिक उपासनेला समर्पित होता. पहाटेच्या मंगल समयी हजारो महिलांनी एकत्रित बसून ‘श्री नवनाथ संकलित ग्रंथाचे’ सामुदायिक पारायण केले. नाथांची सेवा ही केवळ वैयक्तिक नसून, ती समाज आणि निसर्ग रक्षणासाठी कशी आवश्यक आहे, याचा प्रत्यय या दिवशी प्रत्येकाला आला. पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

संमेलनात संमत झालेले ठराव १) निफाडला‘ब’ वर्ग पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा. २) दरवर्षी नाथ साहित्यावर अशी संमेलने व्हावीत. ३) सामाजिक स्तरावर पर्यावरण व जलसंधारण अभियान प्रभावीपणे राबवणे. ४) महाराष्ट्रातील नवनाथांच्या ९ प्रमुख स्थळांना अध्यात्मिक पर्यटन आणि तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *