Headlines

"ट्रॅव्हल जिहाद'चा आरोप करत एक तास रास्ता रोको:आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात कायनेटीक चौकात हिंदुत्वादी संघटनांचे आंदोलन




अहिल्यानगर – पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम वाहकाने हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंदू प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आ. जगताप यांनी घेतली. सुमारे तासाभराने कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याची प्रत आ. जगताप यांना दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप युतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, महिला पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, अहिल्यानगरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स, बसेसमध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे हिंदू महिलांनी आता या ट्रॅव्हल जिहाद विरोधात जागरूक झाले पाहिजे. ज्या बस, रिक्षा व गाडीने महिला प्रवास करत असतील, त्या गाड्यांचे चालक व वाहक हे हिंदू आहेत की नाही याची खात्री करूनच महिलांनी त्या गाडीने प्रवास करावा. बसेससह स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, तक्रार केंद्र सुरू करावे संबंधित वाहकाला सेवेतून बडतर्फ करावे, सर्व एसटी व ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांची पोलिसांनी पडताळणी करावी, अनधिकृत एजंटांवर कठोर कारवाई करावी, बसेस व स्थानकांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, रात्रीच्या वेळी सुरक्षा व पुरेशी प्रकाशयोजना करावी आणि तातडीची हेल्पलाईन व तक्रार केंद्र सुरू करावे. त्याचबरोबर महिला सुरक्षा पथक नेमावे, गुन्हेगारी प्रवृत्तींवर नजर ठेवावी, विशेष मोहीम राबवावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी कृती आराखडा तयार करावा, अशा मागण्या पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ट्रॅव्हल जिहाद विरोधात सकल हिंदू समजाच्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे कोठी चौक परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांना उकाड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *