![]()
सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास मेंढ्या राखण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात पडून बुधवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. गौरव रामदास साबळे (१२), गोपाल साबळे (१०) अशी मृतांची नावे आहेत. किन्ही फाटा येथील रामदास साबळे यांनी मेंढपाळ व्यवसायातून विश्व निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्याकडे स्वमालकीच्या ८ खंडी म्हणजेच १६० मेंढ्या आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले होते. मोठा मुलगा गौरव न्यू ओएसिस इंग्रजी शाळा फुलंब्री तर धाकटा मुलगा गोपाल साबळे स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळा सिल्लोड येथे शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टी लागल्याने दोघेही दहा दिवसांपूर्वी घरी आले होते. दोघेही लहान भाऊ साई (५) सोबत आनंदाने खेळत होते. पण काळाने त्यांचा हा आनंद फार काळ टिकू दिला नाही. अंत्यसंस्कारावेळी निरागस साई नेमक काय? घडलंय या विचाराने टकमक पाहत होता. दोन्ही भावडांवर किन्ही फाटा येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. “मी लेकरांना तिथ न्यायलायचं नको होत असे म्हणत रामदास साबळे यांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटले. या घटनेमुळे साबळे कुटुंबीयांसह संपूर्ण शिवना गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही चिमुकल्यांवर किन्ही फाटा येथील राहत्या घराजवळील शेतात दुपारी ४ च्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी रामदास साबळे पत्नीसह धोत्रा गावानजिकच्या शेतात चराईसाठी सोडलेल्या मेंढ्यांची राखण करण्यासाठी निघाले. त्यावेळी बाबा ‘आम्हालाही मेंढ्या माग येऊ द्या’ असा हट्ट दोन्ही मुलांनी धरला. हट्ट पुरवत वडिलांनी त्यांना सोबत नेले. आठवडी बाजारासाठी रामदास हे पत्नीला घरी सोडण्यासाठी परतले. ते पुन्हा तिकडे निघणार त्यावेळी दोन्ही मुले शेततळ्याजवळ खेळताना पाण्यात पडल्याचा फोन आला. दुसऱ्या मेंढपाळाचा सालदार असलेल्या गणेश सोनवणे याने दोन्ही मुलांना शेततळ्यातील पाण्यात तरंगताना पाहिले. त्याने तातडीने रामदास साबळे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर अमोल दत्तू घणघाव व हरिदास साबळे यांनी ११.३० वाजेदरम्यान मृतदेह बाहेर काढले. रामदास साबळे यांची दोन्ही मुले हुशार होती. मोठा मुलगा गौरव (१२) हा फुलंब्री येथील ‘न्यू ओएसिस’ शाळेत सातवीत शिकत होता. धाकटा गोपाल सिल्लोडच्या ‘स्वामी विवेकानंद’ इंग्रजी शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाळी सुटी लागल्याने मुले घरी आली होती. मात्र, दोघांचाही शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Source link
शिवन्याची घटना:शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आले होते गावी, अंत्यसंस्कारावेळी आक्रोश