Headlines

Admin

जातीय जनगणनेशिवाय आरक्षणाचे उपवर्गीकरण नको; आंबेडकरी चळवळीचा एल्गार:पुण्यात ऐतिहासिक गोलमेज परिषदेत प्रमुख मागण्यांचे ठराव संमत

पुणे येथे झालेल्या ऐतिहासिक गोलमेज परिषदेत आंबेडकरी चळवळीने जातीय जनगणनेशिवाय आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. केवळ अंदाजे आकडेवारीवर आधारित उपवर्गीकरण नको, तर अधिकृत लोकसंख्येच्या आधारावरच ते व्हावे, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत देशात जातीय जनगणना होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंबेडकरी चळवळ कोणत्याही आरक्षणाच्या विरोधात नसून,…

Read More

सेन्सॉरने किरकोळ बदलांसह ‘राजा शिवाजी’ पास केला:मराठी आवृत्तीच्या चित्रपटात रितेश देशमुख राजा शिवाजीच्या भूमिकेत दिसणार

रितेश देशमुख लवकरच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिसणार आहे. आता चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर येत आहे. या चित्रपटाने आपली सेन्सॉर प्रक्रिया पूर्ण केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने याला U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे. मराठी आवृत्तीचा कालावधी 195.05 मिनिटे आहे, म्हणजेच सुमारे 3 तास 15 मिनिटे 5 सेकंद. तथापि, सेन्सॉर बोर्डाने…

Read More

वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात:पुणे स्थानकाजवळ रेल्वे डबा रुळावरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही, सर्व प्रवासी सुखरुप

पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळावरील व्हिडिओ… वंदे भारत ट्रेन रुळावरून घसरल्याची पहिलीच घटना पुणे स्थानकाच्या…

Read More

कोल इंडियाचा नफा 11% वाढून ₹10,839 कोटी झाला:चौथ्या तिमाहीत महसूलही 5.75% वाढला; कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना ₹5.25 लाभांश देईल

कोल इंडियाचा आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफा वार्षिक आधारावर (YoY) 11% वाढून ₹10,839 कोटी झाला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ₹9,751 कोटी होता. कोल इंडियाने आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या एकत्रित महसुलात म्हणजेच उत्पन्नात वार्षिक आधारावर 5.75% वाढ झाली आहे….

Read More

मेळघाटात जलसंकट गहिरे:8 गावांना 19 टँकरने पाणीपुरवठा सुरू

तापमानात वाढ झाल्याने मेळघाटातील जलसंकट अधिक गंभीर झाले आहे. चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये भूगर्भात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीनुसार, या आठही गावांमध्ये रहिवाशांसाठी दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जात…

Read More

केजरीवाल म्हणाले- न्यायमूर्ती स्वर्णकांतांकडून न्यायाची आशा संपली:त्यांच्या मुलाला केंद्राकडून सर्वाधिक प्रकरणे मिळाली, दारू घोटाळा प्रकरणात हायकोर्टात जाणार नाही

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी व्हिडिओ जारी करत म्हटले, ‘दारू धोरण घोटाळा प्रकरणात मी स्वतः उच्च न्यायालयात हजर राहणार नाही आणि माझ्या वतीने कोणीही युक्तिवाद करणार नाही.’ ते म्हणाले, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता यांना पत्रही लिहिले. त्यात म्हटले आहे की, ‘मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून महात्मा…

Read More

आज काय केलं, फुस्सससस, फुस्सससस!:परिवहन खातं पंक्चर झालं का? गुणरत्न सदवार्तेंचा प्रताप सरनाईकांसह राज ठाकरेंवर निशाणा

मुंबईतील रिक्षाचालकांसाठी 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला असून, रिक्षाचालकांना तयारीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरे यांना या मुदतवाढीवरून उपरोधिकपणे डिवचले…

Read More

अनुराग कश्यपच्या ‘डुग डुग’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित:कॉमेडी आणि सटायर शैलीत बनवलेल्या कथेचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खूप कौतुक

ऋत्विक प्रतीक दिग्दर्शित ‘डुग डुग’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा एक उपहासात्मक आणि विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट ऋत्विक प्रतीक यांनीच लिहिला आहे. अनुराग कश्यप, निखिल आडवाणी, विक्रमादित्य मोटवानी आणि वसन बाला यांसारखे चित्रपट निर्माते कार्यकारी निर्माते म्हणून या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. ‘डुग डुग’ च्या ट्रेलरची सुरुवात एका अपघाताने होते, ज्यात एका बाईकस्वाराचा…

Read More

बागेश्वर बाबाच्या वक्तव्याविरोधात नांदगाव, चांदूरबाजारमध्ये आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप; कडक कारवाईची मागणी

धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांच्या कथित अवमानकारक विधानांविरोधात काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नांदगाव खंडेश्वर, चांदूरबाजार आणि अंजनगाव सुर्जी येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसील कार्यालयांवर धडक देत बाबावर तात्काळ आणि कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली. नांदगाव खंडेश्वर येथील आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे…

Read More

कांदा उत्पादकांना कवडीमोल भाव; शेतकरी संकटात:कुऱ्हा परिसरात लागवडीचा खर्चही निघेना, शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली आहे. कांदा लागवडीचा खर्च आणि त्यातून मिळणारे…

Read More