मावसगव्हाणच्या शेतकऱ्यांनी केला शेताकडे जाणारा रस्ता काटेरी मुक्त:शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला
प्रतिनिधी | लोहगाव प्रकल्पग्रस्त मावसगव्हाण गावापासून जवळच असलेल्या नाथसागर जलफुगवटा क्षेत्राकडे जाणारा रस्ता काटेरी झाडांपासून मोकळा करण्यात आला असून या कामासाठी मावसगव्हाण येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत नाथसागराच्या जलफुगवटा क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडांचा प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला. हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून अनेक दिवसांपासून काट्यांमुळे…