डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार:मोर्शी, वरुड रुग्णालयातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव
मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शस्त्रक्रिया आणि रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तसेच दोन्ही रुग्णालयांच्या कायापालटासाठी त्यांना गौरविण्यात आले. हा सत्कार श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने…