सरसगट कर्जमाफी अन् खतांच्या तुटवड्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक:जिंतूर-कनेरगाव नाका मार्गावर तब्बल दोन तास 'रस्ता रोको'!
राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी, बियाणे, खतांचा तातडीने मुबलक पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. 11 सकाळी आकरा वाजता जिंतूर ते कनेरगावनाका मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे गोरेगाव मार्गे विदर्भात जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली, मात्र सदर योजना…