Headlines

Admin

काहीजण कष्ट न करताच पुढे जातात:नमस्कार फक्त ताकदीला अन् चमत्काराला होतो, छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अत्यंत सूचक आणि धारदार वक्तव्ये करत असून, त्यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. “गेल्या २६ वर्षांत काहीजण मेहनतीने पुढे आले, तर काहीजण कष्ट न करताच थेट पुढे निघून गेले,” असा टोला लगावत भुजबळांनी पक्षातल्याच काही नेत्यांवर निशाणा…

Read More

देशातील 56 न्यायाधीश लंडनमध्ये सरकारी खर्चाने बॅटमिंटन खेळतायत:काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांनी पुन्हा एकत्र यावे- संजय राऊत

काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत त्यांनी आपले पक्ष निर्माण केले आहेत त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली येत काँग्रेसची ताकद वाढवण्याची गरज आहे. मग त्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांच्या गटात विलीन होण्यापेक्षा त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे असे मी म्हटलो होतो. हे मी तेव्हा बोललो…

Read More

पुणे महापौर कार्यालय उडवून देऊ:ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवली, पोलिसांचे गस्त

पुण्याच्या महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या ई-मेलमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस दल सतर्क झाले असून, संबंधित परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही संवेदनशील…

Read More

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 'युझर चार्जेस'ला स्थगिती:राज्य सरकारने व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे घेतला निर्णय, विशेष समिती गठित

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने लागू केलेल्या ‘युझर चार्जेस’च्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. व्यापारी संघटनांनी या शुल्कवाढीला तीव्र विरोध दर्शविल्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत, दि पूना मर्चंट्स चेंबर आणि महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेण्यात आली….

Read More

वार-पलटवार:काँग्रेस नेते अतुल लोंढे यांचा आमदार परिणय फुके यांच्यावर घणाघात; नगरसेवकांबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा तीव्र निषेध

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भाजप आमदार आणि माजी मंत्री परिणय फुके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फुके यांनी नगरसेवकांबाबत वापरलेल्या एका आक्षेपार्ह शब्दावरून लोंढे यांनी भाजपच्या संस्कृतीवर आणि निवडणुकीतील त्यांच्या रणनीतीवर सडकून टीका केली आहे. नेमका वाद काय? सध्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले…

Read More

कात्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!:एकाच रात्री 3 फ्लॅट फोडल्याने खळबळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

पुणे शहरातील कात्रज परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत वेगवेगळ्या सोसायट्यांमधील तीन सदनिकांचे कुलूप तोडले. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यापैकी एका घटनेत, एका ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला. अलका उत्तम कवितके (वय 65, रा. मनमंदिर बिल्डींग, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी…

Read More

डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते बिशप स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन:'शाळेने माझ्या आयुष्याचा भक्कम पाया घातला', पूनावाला यांचे प्रतिपादन

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते कॅम्प परिसरातील द बिशप स्कूलच्या नवीन शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पूनावाला यांनी सांगितले की, बिशप स्कूलने त्यांना केवळ शिक्षण दिले नाही, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया घातला. शाळेच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास आपण कायम तयार असल्याचेही त्यांनी…

Read More

मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, परराष्ट्रनितीत पाकिस्तानही पुढे निघून गेला!:विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रुपया शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून, इराण युद्धाच्या सावटामुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत गॅस आणि पेट्रोलचे दर हळूहळू वाढवत आहे. भारताने नेमक्या कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली, हाच मोठा प्रश्न आहे. आज देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत शेजारील पाकिस्तानही आपल्यापुढे निघून गेला…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर:आज एनडीएची घटक पक्षांची बैठक, उद्या नीती आयोगाच्या बैठकीलाही राहणार उपस्थित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या नेतृत्वाची 12 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल होत आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या बैठकीत केंद्र सरकारच्या…

Read More

दिल्ली हॉटेल आग- परवाना मालकाच्या नाही तर कर्मचाऱ्याच्या नावावर:अकाउंटंट म्हणाला- सर्व कागदपत्रे जळून खाक; घटनेच्या दिवशी मेट्रोने शहरात फिरत राहिला

दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये आग लागल्याच्या प्रकरणात चौकशीदरम्यान नवीन खुलासे झाले आहेत. पोलिसांना हॉटेलच्या परवान्यात, कामकाजात आणि अग्निसुरक्षा नियमांमध्ये संभाव्य अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेल मालक लवकेश बजाज आणि अकाउंटंट जय मिश्रा यांच्या चौकशीदरम्यान या गोष्टी समोर आल्या. हॉटेलमधील आगीच्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. 3 जून रोजी झालेल्या या…

Read More