Headlines

Admin

ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण, सेना म्हणाली- दहशतवादाशी लढत राहू:एअर मार्शल अवधेश भारती म्हणाले – असा हल्ला पुन्हा होणार नाही याची खात्री करू

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त जयपूरमध्ये तिन्ही सेनांचे प्रमुख एकत्र आले आहेत. गुरुवारी दुपारी साउथ वेस्टर्न कमांडमध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. 65% शस्त्रे आता आपल्या देशात बनत आहेत. सेना त्याच शस्त्रांचा वापर करत आहे. भारत दहशतवादाविरुद्ध लढत राहील. पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या बंधू-भगिनींना आपण परत…

Read More

अक्षय कुमारच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली:अभिनय कारकिर्दीतून ब्रेक घेतला, पाहण्यात अडचण येत होती; 5 मे पर्यंत शूटिंग करत होता

बॉलिवूडचा खिलाडी कुमारच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे, कारण वर्षाला ३-४ चित्रपट करणारा अक्षय कुमारने चित्रपट आणि अभिनयातून एक छोटासा ब्रेक घेतला आहे. या ब्रेकचे कारण त्याच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याशी संबंधित जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे की अक्षय कुमारची किरकोळ शस्त्रक्रिया झाली आहे, जी ६ मे रोजी सकाळी करण्यात आली. ही एक…

Read More

पुण्यात प्रेमाचा थरार:लग्नास नकार देताच प्रियकराने चिरला प्रेयसीचा गळा; मृत्यूच्या दाढेतून भावाला केला VIDEO कॉल, तरुणीची मृत्यूशी झुंज

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नात्यातील क्रूरता समोर आली आहे. चंदननगर परिसरातील पठारे वस्तीमध्ये एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. लग्नाचे बोलणे फिस्कटल्याच्या रागातून हा रक्ताचा खेळ खेळला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रं…

Read More

पुण्यात सराफ व्यावसायिकाला दीड कोटींचा चुना:20 वर्षांच्या ओळखीचा गैरफायदा घेत 1 किलो सोन्याचा अपहार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांचे शुद्ध सोने घेऊन अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश उमेश संचेती, मंगला उमेश संचेती आणि उमेश तिलोकचंद संचेती (तिघे रा. आदर्शनगर, पुणे-सातारा रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली सेलिना जेटली:फरशी पुसली, घटस्फोटाच्या सुनावणीसाठी ऑस्ट्रियाला गेली, म्हणाली- मला 3 मुलांना भेटू दिले नाही

अभिनेत्री सेलिना जेटलीसाठी गेले काही महिने खूप त्रासदायक होते. भावाला यूएईमध्ये अटक झाल्यापासून ते घटस्फोटाच्या प्रक्रियेपर्यंत. आता अभिनेत्रीच्या घटस्फोटाची सुनावणीही सुरू झाली आहे, ज्यासाठी ती सध्या ऑस्ट्रियामध्ये आहे. इथेच तिच्या मुलाची कबरही आहे. ऑस्ट्रियामध्ये अभिनेत्री तिच्या मुलाच्या कबरीवर गेली आणि ढसाढसा रडताना दिसली. सेलिना जेटलीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून स्मशानभूमीचा एक व्हिडिओ पोस्ट केला…

Read More

नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं:मुरूम माफियांची दहशत वाढली; नागपुरात कायद्यालाच खुलं आव्हान

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मुरूम माफियांनी थेट चालत्या जेसीबीला लटकवत तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महसूल आणि पोलिस…

Read More

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त:मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त

वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोला सह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे….

Read More

नागपूर हादरले:इन्स्टाग्रामवरील 'प्रेम त्रिकोण' ठरला जीवघेणा, कळमना परिसरात 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या

सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील आकर्षण जेव्हा टोकाच्या द्वेषात बदलते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, याचा धक्कादायक अनुभव नागपूरच्या कळमना परिसरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या वादाने अवघ्या 17 वर्षांच्या जोहरान मुस्तफा शेख या तरुणाचा बळी घेतला आहे. मैत्रीच्या नावाखाली ‘डेथ कॉल’ घटनेची सुरुवात झाली ती सोशल मीडियावरील मैत्रीतून. जोहरान आणि…

Read More

गायिकेने थलापती विजयच्या पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले:कार्यकर्त्याला लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक झाली, चिन्मई श्रीपदा म्हणाली- सगळे सारखेच आहेत

थलापती विजय यांच्या TVK (तमिळ वेट्री कळघम) पक्षाने तामिळनाडू निवडणुकीत 108 जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी विजय यांच्या पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची निंदा केली आहे. चिन्मयी श्रीपदा यांनी…

Read More

व्याकरणाचे दडपण नको, भाषेतील गंमत ओळखा:अभिजात मराठी पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी- डॉ. नीलिमा गुंडी

पुणे: ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी म्हटले आहे की, भाषेच्या व्याकरणाचे दडपण न घेता त्यातील गंमती समजून घेऊन भाषा शिकता आली पाहिजे. पुढील पिढीपर्यंत अभिजात मराठी भाषा पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे साहित्य प्रसार आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‘बालकुमार शब्दोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये…

Read More