Headlines

पार्थ पवारांच्या विधानावर रोहित पवारांकडून काँग्रेसची दिलगिरी:अजित पवार प्रकरणी FIR दाखल करण्यास सरकारने विरोध का केला, सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली…

Read More

राजकारणात मोठा धक्का:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन; बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या संवादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असताना ही निवडणूक बिनविरोध…

Read More

संजय राऊत, पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका:तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही, मग पाकिस्तानची यंत्रणा नेमायची का? भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

अजित पवार यांच्या अपघाताचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. उलट सरकारकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शरद पवारांपेक्षा संजय राऊत मोठे झाले का? असे संशयाचे वातावरण निर्माण केल्याने काहीही होणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी कायद्याचे थोडेस ज्ञान घेतले पाहिजे, अपघात प्रकरणी एडीआरच दाखल होत असतो….

Read More

पुण्यात तरुणावर गोळीबार, एक गंभीर जखमी:वडगाव बुद्रुकमध्ये पूर्ववैमनस्यातून हल्ला; आरोपींचा शोध सुरू

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चरवड वस्तीमधील एका मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला. या हल्ल्यात सुरज गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज गायकवाड आपल्या मित्रासह वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्ती परिसरातील एका मोकळ्या मैदानात थांबला…

Read More

मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी चुरस:संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख मैदानात, अश्विनी देशमुखही सज्ज

मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय कलाटणी देणारा ट्विस्ट समोर आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावात प्रयत्न सुरू असतानाच, दिवंगत संतोष देशमुख यांच्याकडून पूर्वी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी आपण सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

गहिनीनाथ गडावर फडणवीसांचे भाष्य चर्चेत:नाशिक प्रकरणावर तपासाची घोषणा, भाविकांकडून मुंडेंना मंत्री करण्याची मागणी

नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत सखोल तपास करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित 94 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात सहभागी होत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. याचबरोबर बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी संपर्क साधल्याची कबुली देत त्यांनी राजकीय चर्चेलाही वेगळं वळण दिलं….

Read More

पुणे महापालिका डॉ. आंबेडकर जयंतीसाठी देणार अद्ययावत सुविधा:उपमहापौर वाडेकर म्हणाले – यंदाचा उत्सव संस्मरणीय ठरेल

पुणे महापालिकेकडून यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा जयंती उत्सव संस्मरणीय ठरेल, अशी ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जयंती उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आंबेडकर पुतळा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक नीलेश…

Read More

कोकणातील शेतकऱ्यांना दिली बोगस खते, कीटकनाशके:कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मागणी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा…

Read More

वयोवृद्धाचा खून करून जबरी चोरी, दोन आरोपींना अटक:पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, 5 गंभीर गुन्हे उघडकीस

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी एका वयोवृद्ध व्यक्तीच्या खून आणि जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खून, दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दामोदर जयराम मिंडे (वय ६२, रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव,…

Read More

सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच काँग्रेसची बारामतीतून माघार:हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे. सपकाळ यांनी…

Read More