- Marathi News
- National
- Manipur Government Silent Even After The Death Of Children; Imphal Is Burning, Atmosphere Of Fear Even After 3 Years
डी. कुमार | इंफाळ45 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

३८ वर्षीय रोहित राजधानी इंफाळमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून शहरात होत असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे त्यांचा रोजगार ठप्प झाला आहे. सोमवारी सकाळपासून संचारबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर इंफाळमध्ये तसे सर्वकाही सामान्य वाटत आहे, परंतु ताज्या निदर्शनांबाबत कुणाशीही बोला, तो विद्यमान सरकारवर नाराज आहे. कारण ७ एप्रिल रोजी कुकी उग्रवाद्यांच्या हल्ल्यात २ मुले ठार झाली.त्यावर सरकार गप्प आहे.
मणिपूर सरकारमध्ये सर्व वेगवेगळ्या समुदायांचे नेते
मणिपूरमधून फेब्रुवारीत राष्ट्रपती राजवट हटली. खेमचंद नवे मुख्यमंत्री बनले. पण, दोन महिन्यांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. ६० जागांच्या विधानसभेत मंत्रिमंडळात १२ लोक असले पाहिजेत. सध्या मुख्यमंत्र्यांसह ५ लोक आहेत. यात खेमचंद, गृहमंत्री गोविंददास, सांस्कृतिक मंत्री खुरैजम सिंह हे मैतेयी आहेत. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक कुकी तर दुसरे नागा आहेत. त्यामुळे एकमत होत नाही.