Headlines

Mumbai MP Sanjay Dina Patil Abuses Journalists; Raut Demands UAPA Arrest


ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घर

.

“कॅमेरा बंद कर, नाहीतर मारून पाठवीन!”

खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत ‘माझ्या विरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेन’ असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर पाटील संतापले. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच आपला तोल गमावला आणि पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संतापाच्या भरात पाटील म्हणाले: “अरे भाई, बस झालं ना आता! किती अति करताय? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय, आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!” सत्तेत आल्यावर एका विद्यमान खासदाराचा असा तोल ढळणे आणि थेट पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावणे, यावरून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संजय राऊतांचे पोलिसांना पत्र

संजय दिना पाटील यांच्या या जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पाटलांवर कठोर कारवाई करत अटकेची मागणी केली आहे. पत्रात राऊत म्हणाले, “पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी मोदींना 100 वेळा विचार करावा लागतो, पण हे महाशय थेट बॉम्ब टाकण्याची भाषा करत आहेत. जर त्यांच्याकडे बॉम्ब आहेत, तर ते घरात बनवलेत की दहशतवाद्यांनी दिले? हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असून याची एटीएसने (ATS) चौकशी करावी आणि त्यांच्यावर ‘यूएपीए’ (UAPA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.”

ते पुढे म्हणाले, “पाटील यांनी ‘मी याआधी पाच लोकांना मारले आहे’ असा दावा केला आहे. या दाव्याची स्वतंत्र चौकशी करून सत्यता तपासावी आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.” पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई न केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. भविष्यात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी खासदार पाटील यांच्यावरच राहील, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांचे उत्तर आणि पाटलांची सारवासारव

संजय राऊत यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्यात आम्ही कुणाचेही घर बॉम्बने उडवून देऊ देणार नाही. पोकळ धमक्यांना कोणीही घाबरण्याचे कारण नाही. जर कोणी अशा धमक्या देत असेल, तर त्याला पोलिस योग्य ते उत्तर देतील.”

दुसरीकडे, आपल्या विधानावर सारवासारव करताना संजय दिना पाटील म्हणाले होते की, “माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी ‘जन्मायच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेव्हा ५ लोक मेले होते’ असे म्हणालो होतो. मी कोणाला का मारेल?” मात्र, हे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याने या प्रकरणाने आता आणखीच गंभीर वळण घेतले आहे.

संबधित बातमी वाचा…

विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन: संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन,” अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *