राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग:विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी निवडणुका; पावसाळी अधिवेशनाआधी मोठी घडामोड
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेतील सदस्यसंख्येवर त्याचा परिणाम झाला होता….