Headlines

रितू तावडेंना डोक्याचा भाग आहे का?:पदमुक्त झाल्यावर माझ्याच बाजूला बसतील, तेव्हा बघून घेईन; किशोरी पेडणेकरांचा इशारा

महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना किशोरी…

Read More

भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द:मंत्री उदय सामंत यांची माहिती; राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदीची करण्यात आली होती सक्ती

राज्याच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी येत्या 28 जून रोजी आयोजित केलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा हिंदी सक्तीच्या मुद्यामुळे वादात सापडली होती. मनसेने या प्रकरणी प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यासंबंधीच्या माहितीनुसार, राज्याच्या भाषा संचालनालयाने येत्या…

Read More

सॅमसंग-इलेक्ट्रॉनिक्सचे बाजार मूल्य 1 ट्रिलियन डॉलरच्या पुढे:असे करणारी आशियातील दुसरी कंपनी, AI चिप्सच्या मागणीमुळे वर्षभरात शेअर 4 पटीने वाढले

दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे बाजार मूल्य 1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 95.08 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे जगातील या सर्वात मोठ्या मेमरी चिप उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात सुमारे 400% वाढ झाली आहे. बुधवारी कामकाजादरम्यान सॅमसंगच्या शेअर्समध्ये 15% ची वाढ झाली आहे. यासोबतच, तैवानच्या TSMC…

Read More

'वंदे मातरम'ला राष्ट्रगीतासारखा दर्जा, मंत्रिमंडळाची मंजुरी:अपमान केल्यास किंवा गायनात अडथळा आणल्यास शिक्षा-दंड; जन-गण-मन पूर्वी गायले जाईल

केंद्र सरकारने वंदे मातरमला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ समान दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे…

Read More

रितेशच्या ‘राजा शिवाजी’ने 50 कोटींचा टप्पा पार केला:टॉप-5 मराठी चित्रपटांत समाविष्ट; राज्यात करमुक्त करण्याची मागणी

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी (मंगळवारी) चित्रपटाच्या कमाईत थोडी घट दिसून आली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, मंगळवारी चित्रपटाने मराठी व्हर्जनमध्ये सुमारे ३.३५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन…

Read More

रुग्णवाहिकेला चालक नाही अन् रस्ता खराब:मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेला दुचाकीवर नेले, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; गडचिरोलीतील घटना

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. तसेच दळणवळणाचीही दुरावस्था दिसून येत आहे. याचाच फटका एका महिलेच्या जिवावर बेतला आहे. वेळेवर उपचार तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिला दुचाकीवरून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळी आली होती. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी…

Read More

Vijays GOAT Film CM 2026 Connection

23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तमिळ अभिनेता विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणात नायकासारखी एन्ट्री केली आहे. त्यांच्या TVK पक्षाने 234 पैकी 108 जागांवर विजय मिळवला आहे. यादरम्यान विजयच्या GOAT चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रपटातील एका सीनला त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या योजनेशी जोडून पाहिले जात आहे. चित्रपटाच्या व्हायरल क्लिपमध्ये विजय एक कार चालवताना दिसत आहे, ज्याच्या…

Read More

मंत्रिपद सोडून छगन भुजबळ राज्यसभेत जाणार का?:सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांच्या नावाची चर्चा; भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. सायंकाळी 5 वाजता राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार त्यांचा राजीनामा देणार असल्याचे समजते. यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. आता सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू असून यात…

Read More

भाजपची बंगालनंतर आता महाराष्ट्रावर नजर:SIR वर लक्ष केंद्रित; मराठी मुलूख जिंकण्यासाठी सर्व लहानथोर कार्यकर्त्यांना देणार प्रशिक्षण

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. भाजपने बंगालमध्ये एसआयरच्या जोरावर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. आता हीच रणनीती भाजप महाराष्ट्रात राबवण्याची शक्यता आहे. यासाठी मराठी मुलूखावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने आपल्या सर्वच स्तरांवरील कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा मागील 15 वर्षांपासून पश्चिम बंगालचा गड…

Read More

SC त न्यायाधीशांची संख्या वाढून 37 होईल:मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिली, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक सादर केले जाईल

केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकार संसदेच्या पुढील अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक सादर करेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 33 न्यायाधीशांची निश्चित संख्या आहे. सरकार यात चार नवीन न्यायाधीश जोडण्यास इच्छुक आहे. यासाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणले जाईल….

Read More