Headlines

प्रगतीसाठी आदर्श निवडा; पीएसआय चटे यांचे मार्गदर्शन:संघर्ष योद्धा संस्थेच्या करिअर मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद

अमरावती येथील महाजनपुरा येथे ‘संघर्ष योद्धा बहुउद्देशीय संस्थे’ने ‘करिअर मार्गदर्शन सत्र २०२६’ चे आयोजन केले. या सत्रात राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक रोशन चटे यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी आयुष्यात एक आदर्श निवडण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची तत्त्वे आत्मसात केल्यास संकटांवर मात करून यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या…

Read More

UP- स्फोटाचा कट रचणारे 2 संशयित दहशतवादी अटक:ज्या पाकिस्तानी गुंडाच्या संपर्कात, त्याने काल पंजाबमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती

यूपीमध्ये बुधवारी अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) ने पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी देशातील संवेदनशील ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट आणि पोलीस पथकावर हल्ल्याचा कट रचत होते. आरोपींमध्ये बाराबंकी येथील 23 वर्षीय दानियान अशरफ आणि कुशीनगरचा रहिवासी 20 वर्षीय कृष्णा मिश्रा यांचा समावेश आहे. दोघेही पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी, आबिद जट आणि…

Read More

कोरेगाव पार्क पोलीस हवालदार दीड लाखांची लाच घेताना अटक:अजामीनपात्र वॉरंट टाळण्यासाठी एसीबीने केली कारवाई

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. अजामीनपात्र वॉरंट बजावू नये आणि संबंधित व्यक्तीला अटक टाळण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, पोलीस हवालदार, बक्कल नंबर २७८१) असे अटक करण्यात…

Read More

आर्ट ऑफ लिव्हिंगचा 45 वा स्थापना दिवस, पंतप्रधान उपस्थित राहणार:10 मे रोजी बंगळुरूमध्ये कार्यक्रम; 182 देशांतील लोक सहभागी होतील

बंगळुरू येथे 10 मे रोजी ‘आर्ट ऑफ लिविंग’चा 45 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला जाईल. पंतप्रधान मोदी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असतील. ते कार्यक्रमाला संबोधितही करतील. पंतप्रधान आर्ट ऑफ लिविंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात एका नवीन ‘ध्यान मंदिरा’चेही उद्घाटन करतील. यासोबतच ते मानसिक आरोग्य, ग्रामीण विकास, निसर्ग संवर्धनाशी संबंधित योजनाही सुरू करतील. हा कार्यक्रम श्री श्री रविशंकर…

Read More

शेंदुरजनाघाटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई:60 लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांना घेतले ताब्यात

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश ग्रामीणचे…

Read More

पतीला फसवण्याची धमकी देत पत्नीकडे 10 लाख मागितले:एआय फोटो वापरून खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो तयार करत पतीला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका महिलेकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली असून, महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एक महिला, एक अनोळखी व्यक्ती आणि एक…

Read More

अमरावतीत रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण दोन्ही प्रभावित:जीएमसी-इर्विन रुग्णालयांच्या हस्तांतरणामुळे निर्माण झाला पेच

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) यांच्यातील हस्तांतरणाच्या वादामुळे रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण दोन्ही प्रभावित झाले आहे. जीएमसीच्या शिकाऊ डॉक्टरांना अभ्यासासाठी रुग्ण मिळत नाहीत, तर इर्विन रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. हा तांत्रिक पेच वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांपर्यंत पोहोचला असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अमरावतीमध्ये…

Read More

मेळघाटातील कढावमध्ये पाणीटंचाई, सीईओंचे टँकर पुरवठ्याचे आदेश:टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता 9 वर पोहोचली

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कढाव येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मेळघाटातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कढाव गावात पाण्याचा कोणताही स्थानिक स्रोत उपलब्ध नाही. यापूर्वीच चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंडळाचे 1032 कोटी थकीत:कंत्राटदार आर्थिक कोंडीत, कामांची गती मंदावली

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामांची तब्बल १०३२ कोटी रुपयांची देयके गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. यामुळे संबंधित कंत्राटदार मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले असून, ही कोंडी त्वरित दूर करावी, अशी मागणी अमरावती डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही देणी १ एप्रिल २०२६ पर्यंतची असून त्यात आणखी वाढ…

Read More

दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष मुक्त:न्यायालयाच्या निकालावर किरीट सोमय्यांनी बाळगले मौन, प्रतिक्रिया देणे टाळले

दापोलीतील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांना खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या जमीन हडप आणि सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाच्या गंभीर आरोपांनंतर, न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक…

Read More