Headlines

प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात

पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. “हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी महिला हेरास…

Read More

Gujarat 11,000 Vacancies, Himachal Teachers 808, UPSC Officers 16

7 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 11000 पदांची भरती निघाली आहे, ज्यासाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. हिमाचल प्रदेशात शिक्षकांच्या 808 जागा आणि पंजाब अंगणवाडीत 94 पदांवर भरती. तसेच, UPSC मध्ये 16 रिक्त जागा. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 4. गुजरातमध्ये 11000 पदांची भरती, उद्यापासून अर्ज सुरू गुजरात…

Read More

मनपा क्षेत्रात 67 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे दोन थेंब:अमरावतीत मोहिमेची तयारी, आयुक्त वर्षा लड्डा यांचे आवाहन‎

देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या ब . या बैठकीस मनपा आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, एन.एम.ए….

Read More

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार:पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने…

Read More

निकृष्ठ धान्य पुरवठ्याचा भाकपकडून तीव्र निषेध:तहसीलदारांना दिले निवेदन, गहू खाण्यास चांगला नसून तांदळामध्ये बारीक चुरी, भुकटी मिश्रीत कण‎

सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना पुरविण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान खाण्यायोग्य धान्य मिळावे, या मागणीसाठी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले . केंद्र व राज्य सरकार गरीब आणि निराधार जनतेला अन्नावाचून कोणी राहु नये, प्रत्येकास उपजिविका करता यावी, या उदात्त हेतूने प्रतिमानसी प्रतिमाह तीन किलो तांदूळ…

Read More

नसरापूरचा नराधम:नसरापूरच्या नराधमाने ज्याच्यासमोर खुनाची कबुली दिली तो साक्षीदार पोलिसांत हजर

नसरापूर येथे १ मे रोजी ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेने ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा खून केला. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, पोलिस कोठडीत तो तोंड उघडत नव्हता. कोर्टासमोरही त्याने निर्लज्जपणे असे सांगितले की, किरकोळ वादातून मला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस साक्षी-पुरावे गोळा…

Read More

अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठात रूपांतर, उच्चस्तरीय समिती स्थापन:शैक्षणिक गुणवत्ता; आरक्षण-शुल्क नियंत्रण यावर दोन महिन्यांत अहवाल

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अधिक स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन आणि इतर संबंधित घटकांकडून होत असलेल्या मागण्या लक्षात घेऊन, या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत उच्च व…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 77,000 वर:निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण, आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार

आठवड्याच्या दुसऱ्या व्यावसायिक दिवशी म्हणजेच 5 मे रोजी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरून 77,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,000 च्या पातळीवर आला आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 4 मे रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती 7 दिवसांत FII ने 10,514…

Read More

IAS तुकाराम मुंढेंचा गुटखा माफियांवर दणका:राज्यात अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट 'मकोका' लावण्याचे आदेश, काय म्हणाले मुंढे?

अन्न व औषध प्रशासनाचे सूत्र हाती घेतल्यानंतर आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. अनेक ठिकाणी छापे मारून अवैध गुटखा, पान मसाले जप्त केले आहेत. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या संपूर्ण कारवाई प्रकरणी मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम…

Read More