![]()
पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. “हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी महिला हेरास देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. कुरुलकर याच्याविरोधात शासकीय गुपिते अधिनियमाच्या कलमांनुसार मुंबई येथील काळाचौकी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर डॉ. कुरुलकरला दहशतवादविरोधी पथकाने ४ मे २०२३ ला अटक केली होती. या प्रकरणात एटीएसने ३० जून २०२३ रोजी दोन हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. त्यामध्ये डॉ. कुरुलकर व दासगुप्ता यांच्या चॅटिंगमधून संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड झाले होते.
Source link
प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात