रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वाद वाढला:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट; म्हणाले- शिकवू पण वाद नको
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयानुसार रिक्षा आणि…