Headlines

नागपुरात तोतया पोलिस-पत्रकारांना अटक:पोलिस ठाण्यात 'गोळ्या घालून उडवून टाकू' म्हणत केला ड्रामा; पोलिसांना दिली धमकी

नागपूर पोलिसांनी स्वतःला मोठे पोलिस अधिकारी आणि पत्रकार सांगत पोलिस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या चार तोतयांना अटक केली आहे. या आरोपींनी थेट पोलिसांनाच ‘गोळ्या घालून उडवून टाकू’ अशी धमकी दिली, ज्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गौरव हरिप्रसाद पांडे (वय 31), सचिन सुरेशसिंह बैस (वय 42), नरेंद्र लल्लूजी चौबे (वय 57) आणि जितेंद्र अशोककुमार कुंदवाणी (वय…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरणावरून भडकली अभिनेत्री:आंचल खुराना म्हणाली- सियाला धक्का देऊन संपवून टाकायला पाहिजे, कोणतीही केस होऊ नये

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक कुटुंबाशी संबंधित केतन अग्रवालच्या कथित हत्येप्रकरणी टीव्ही अभिनेत्री आंचल खुरानाने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर आंचल खुरानाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “एका करोडपती बापाच्या मुलाचे एका करोडपती बापाच्या मुलीशी अरेंज मॅरेज ठरते. दोन्ही कुटुंबे खूप जवळची होती, त्यामुळे त्यांनी मुलामुलींचे लग्न ठरवले, पण मुलीचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते….

Read More

30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी:उष्माघाताने मृत्यू झाल्यासही मिळणार मदत; विधानसभेत कृषिमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नियम 293 अन्वये शेतीच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. “महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, 30 जूनपूर्वी राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल,” अशी मोठी माहिती त्यांनी…

Read More

45 हजार सभासद 'अ' वर्ग होणार:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत ऐतिहासिक निर्णय

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, अशी माहिती महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, प्रवीण पाटील (वासू पाटील), सहखजिनदार शरद चव्हाण, विजय…

Read More

महापौरांना मुंबईपेक्षा ढाकामध्ये काय चाललंय यात जास्त रस:मॅनहोल दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंचा भाजप आणि रितू तावडेंवर कडाडून हल्ला

मुंबईत मुसळधार पावसात थेट महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यांदेखत एक नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून महापौर आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “सध्याच्या महापौरांना मुंबईत काय चाललंय, यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय…

Read More

मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले

मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एक्स-67’ क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे अंतर पार केले. हे गिधाड नुकतेच राजस्थानमधील प्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले. या गिधाडाचा जन्म कृत्रिम पैदास केंद्रात झाला होता. 2 जानेवारी 2026 रोजी…

Read More

मुंबईत स्मार्ट कारभाराचे धिंडवडे:महापौरांच्या डोळ्यांदेखत BMC अधिकार मॅनहोलमध्ये पडला, गांधी नगरमधील घटना

मुंबईत आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे या पाहणी करत असताना, त्यांच्यासमोर महापालिकेचा एक अधिकारी रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना गांधी नगर परिसरात घडली. या थरारक आणि गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुंबईकरांमधून…

Read More

MP Bajrang Sonawane Aggressive on Sons Allegations; Attacks Munde

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी आता राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर, आणि खासदार बजरंग सोनव . मुलावर आरोप हे जाणीवपूर्वक राजकारण; तपासाला सहकार्य करणार आपल्या मुलावर होत असलेल्या आरोपांबद्दल खासदार बजरंग सोनवणे यांना विचारले असता…

Read More

कोलकाता येथे बांधकाम सुरू असलेले गोदाम कोसळले, 5 जणांचा मृत्यू:50-55 लोक दबले असण्याची शक्यता, 4 जणांना वाचवले; सेनाही बचावकार्यात सामील

कोलकाताच्या पश्चिम भागातील तारातला येथे बुधवारी दुपारी एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळले. या दुर्घटनेत 5 लोकांचा मृत्यू झाला, तर 50-55 लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 4 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ही दुर्घटना तारातला परिसरातील ब्रेस ब्रिजजवळ, ट्रान्सपोर्ट डेपो रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामात घडली….

Read More

Highways Get Lakhs of Crores, No Farmer Loan Waiver Funds?

राज्यातील शेतकरी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. पावसाळी अधिवेशनात नियम 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत सहभागी ह . कर्जमाफीवरून सरकारला सुनावले चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी 2008 मध्ये केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचा उल्लेख केला. तसेच राज्यातील विविध…

Read More