Headlines

एकात्मिक किनारी सुरक्षा कायदा लागू करा:नागरिक सोशल फाउंडेशनची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील किनारी सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी, माहिती देवाणघेवाणीतील विलंब, विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि किनारी भागातील अपुरी देखरेख या समस्या अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिक सोशल फाउंडेशनने केंद्र व राज्य सरकारकडे ‘युनिफाइड कोस्टल सिक्युरिटी ॲक्ट’ (एकात्मिक किनारी सुरक्षा कायदा) लागू करण्याची मागणी केली आहे. फाउंडेशनचे ॲड….

Read More

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळतील:निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत दिनांक ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न…

Read More

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून तब्बल २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभागाच्या शासन…

Read More

पुण्यात जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा:3 हजारांहून अधिक क्रीडापटूंचा सहभाग, शनिवारवाड्यातून रॅलीची सुरुवात

पुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ऑलिम्पिक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात पुणे शहर व जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक खेळाडू, ऑलिम्पियन्स, क्रीडा शिक्षक आणि मान्यवर सहभागी झाले होते. या दिनानिमित्त…

Read More

दीक्षाभूमी स्मारक समितीचा वाद चिघळला:भंते ससाईंना हटवून विलास गजघाटे अध्यक्षपदी नियुक्त

दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेनापती भंते सुरेई ससाई यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुमताने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत केला. डॉ. गवई यांच्या मते, भंते सुरेई ससाई…

Read More

विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त:डॉ. रवींद्र सिंगल यांची बदली; एसीबीची जबाबदारी

नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सिंगल यांच्याकडे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर नांगरे पाटील एसीबीचे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. नवे पोलीस…

Read More

पुणे-पिंपरी-चिंचवडसाठी 'डीएसएस' प्रणालीचे उद्घाटन:स्वच्छ हवा व्यवस्थापनासाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला बळ

सीआयआय क्लीनर एअर बेटर लाईफ (सीएबीएल), पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ हवेसाठी एका बहुभागधारक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी ‘डिसिजन सपोर्ट सिस्टिम’ (डीएसएस) या अभिनव प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सीआयआय क्लीनर एअर बेटर…

Read More

महाराष्ट्र पोलिसांसाठी 'एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म':गुन्हे तपासात 'एआय' आणि 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर

महाराष्ट्र पोलिसांच्या ताफ्यात लवकरच एक अत्याधुनिक यंत्रणा सामील होणार आहे. गुन्ह्यांचा तपास अधिक काटेकोर, पारदर्शक आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा बनवण्यासाठी ‘एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म’ विकसित केला जात आहे. राज्य सरकारच्या ‘मार्व्हल’ (MARVEL) या विशेष उद्देश संस्थेद्वारे ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली तयार केली जात आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीला राज्यातील दोन पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक…

Read More

नागपुरात 'ऑपरेशन थंडर 2.0' अंतर्गत 23 कोटींचा मुद्देमाल जप्त:1515 तस्करांना अटक; 50 लाखांपर्यंत पोहोचली जनजागृती मोहीम

नागपूर शहर पोलिसांनी ‘ड्रग्समुक्त नागपूर-सुरक्षित नागपूर’ या ध्येयाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन थंडर २.०’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या अडीच वर्षांत २३.२१ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, १,५१५ तस्करांना अटक करण्यात आली आहे. कठोर कायदेशीर कारवाई, व्यापक जनजागृती आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम प्रभावी ठरली आहे….

Read More

हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांची बदली:खामगाव चे अपर पोलीस अधीक्षक लोढा सांभाळणार जिल्ह्याची धुरा

हिंगोली जिल्ह्यात अवघ्या सहा महिन्यांमध्ये आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप उमटवणारे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांची नांदेड येथे बदली झाली असून खामगाव येथून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस दलाची धुरा सांभाळणार आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात रुजू झालेल्या डॉक्टर निलाभ रोहन यांनी अवघ्या सहा महिन्यात आपल्या कार्याची छाप उमटवली होती. जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर…

Read More