Headlines

अंबरनाथ हादरले:ठाण्यामध्ये लिव्ह-इन पार्टनरच्या मुलास ठार मारले, आरोपी अटकेत




ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पश्चिम भागात आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई केली. आरोपी विकास हुकूम सिंग (२४) याने हसनैन ऊर्फ जउद्दीन याला बेदम मारहाण केली. हसनैनची आई सकीना (२८) हिने आपल्या पतीपासून विभक्त होऊन आरोपीसोबत राहण्यास सुरुवात केली होती. हसनैन हा त्यांच्या नात्यात अडथळा वाटत असल्याने आरोपीने त्याला मारहाण केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. हे जोडपे २६ जूनपासून एकत्र राहत होते. ही घटना १७ आणि १८ जुलै रोजी लाडी नाका भागात घडली. हात-पायांवर गंभीर दुखापती या मारहाणीत मुलाच्या छातीवर, हात-पायांवर आणि गुप्तांगावर गंभीर दुखापती झाल्या. मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयात या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आईने २० जुलै रोजी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. विकास हुकूम सिंग याला २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *